सोनम वांगचुक यांची पहिली अट मान्य; हायकोर्टाचे थेट केंद्र सरकारला आदेश

Sonam Wangchuk Hospital Transfer Delhi High Court Decision: सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेडांता रुग्णालयात हलवण्यास दिल्ली हायकोर्टाची परवानगी. मात्र हा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा, अशी केंद्र सरकारची अट. नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय.
Activist Sonam Wangchuk undergoing treatment at Safdarjung Hospital amid ongoing hunger strike and NEET protests in Delhi.
Activist Sonam Wangchuk undergoing treatment at Safdarjung Hospital amid ongoing hunger strike and NEET protests in Delhi.saam tv
Published On

नीट पेपरफुटीवरून दिल्लीमध्ये आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून जोपर्यंत सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा निर्धार तरुणांनी व्यक्त केला आहे. तसेच सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असताना त्यांना उचलून रुग्णालयात नेण्यात आले. उपोषण सुरू असताना त्यांना असे हॉस्पिटलमध्ये नेणे म्हणजे दडपशाही आहे असा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. तसेच त्यांनी दिल्ली हाय कोर्टात याचिका देखील दाखल केली.

यामध्ये त्यांनी सोनम वांगचुक यांना उपचार खासगी रुग्णालयात देण्यात यावे. यावरच मंगळवारी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने स्पष्ट केले की, सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफरदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेडांता रुग्णालयात हलवण्यास त्यांची कोणतीही हरकत नाही. मात्र, हा निर्णय पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा, रुग्णाच्या इच्छेनुसार नव्हे, अशी भूमिका केंद्र सरकारने मांडली.

Activist Sonam Wangchuk undergoing treatment at Safdarjung Hospital amid ongoing hunger strike and NEET protests in Delhi.
समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात, मुंबईला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा मृत्यू

जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, वांगचुक यांना सफरदरजंगहून मेडांतात हलवण्यास सरकारला कुठलीही अडचण नाही. मात्र त्यांचा डिस्चार्ज हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हावा, त्यांच्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून नसावा. त्यांनी यावेळी वांगचुक यांच्या आजूबाजूच्या काही लोकांबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, काही जण त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांना रुग्णालयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातला निकाल दिला असून वांगचुक यांना मेडाता यांना रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली आहे. ही सुनावणी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झाली.

Activist Sonam Wangchuk undergoing treatment at Safdarjung Hospital amid ongoing hunger strike and NEET protests in Delhi.
क्रीडा विश्वात मोठी खळबळ! बलात्कार प्रकरणात अडकला स्टार खेळाडू, कोर्टाकडून तात्काळ अटक करण्याचे आदेश अन्...

दरम्यान, सोनम वांगचुक सध्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या विविध तज्ज्ञांच्या पथकाकडून देखरेख ठेवली जात आहे. नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपोषणादरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आरोग्य अहवालानुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com