क्रीडा विश्वात मोठी खळबळ! बलात्कार प्रकरणात अडकला स्टार खेळाडू, कोर्टाकडून तात्काळ अटक करण्याचे आदेश अन्...

Abishek Porel rape case latest news : दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले.
Abishek Porel,
Abishek Porel DC, IPL
Published On

Abishek Porel, Kolkata High Court : भारतीय क्रिकेट जगतातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने पोरेल याला अटक करण्याचे थेट आदेश दिले आहेत. बलात्कार प्रकरणात अभिषेक पोरेल याच्याविरोधात न्यायालयाने ही कठोर भूमिका घेतली आहे.

वारंवार समन्स बजावूनही किंवा न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे हायकोर्टाने पोलिस प्रशासनाला अभिषेक पोरेलला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. या अचानक आलेल्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने आयपीएलमधील दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू अभिषेक पोरेलचे नाव एका बलात्कार प्रकरणात समोर आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी पोलिसांना क्रिकेटपटूची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे निर्देशही दिले.

Abishek Porel,
Gold Rate Today : सोनं खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ आणि १८ कॅरेटचा आजचा भाव काय?

आयपीएल क्रिकेटपटूविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या पीडितेच्या डिव्हाइसमध्ये काही छायाचित्रे असण्याची शक्यता असल्याने न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या पोरेलविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. पीडितेने तक्रारीत म्हटले की, पोरेलने २३ जून २०२६ रोजी तिच्यावर हल्ला केला. त्याशिवाय धमकीही दिली.

Abishek Porel,
NEET पेपर लीक प्रकरणावर पीएम मोदींचं सर्वात मोठं विधान! दोषींवर होणार अशी कारवाई की... केंद्रीय मंत्र्याने दिली मोठी माहिती

न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी पोलिसांना तपासात अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही दिले. पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. जूनमध्ये एका विद्यार्थिनीने हुगळीतील मोगरा पोलीस ठाण्यात क्रिकेटपटू अभिषेक पोरेलविरोधात गंभीर तक्रार दाखल केली होती. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे आणि आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणे, यासह अनेक गंभीर आरोप तिने केले आहेत. या प्रकरणी आता कोर्टाने अभिषेक पोरेल याला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com