NEET पेपर लीक प्रकरणावर पीएम मोदींचं सर्वात मोठं विधान! दोषींवर होणार अशी कारवाई की... केंद्रीय मंत्र्याने दिली मोठी माहिती

PM Modi On NEET paper leak : नीट पेपर लीक प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
PM Narendra Modi on Neet
PM Narendra Modi on Neet
Published On

NEET परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे देशभरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांकडून न्यायाची मागणी केली जात आहे. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे समोर आले आहे. (NEET Paper Leak Row)

या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दिले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कोणतीही गय करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जंतरमंतरवरील वाढत्या विरोधानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता या प्रकरणातील दोषींवर नेमकी काय कारवाई होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

PM Narendra Modi on Neet
धक्कादायक! जिपलाइन राइडदरम्यान ४० फुटांवरून तोंडावर कोसळला तरुण; रिसॉर्टचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्याआधी सकाळी एनडीए खासदारांची 'मंगल मिलन' बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, पंतप्रधान मोदींनीही या बैठकीत पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की, नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीसाठी दोषी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल.

PM Narendra Modi on Neet
महाराष्ट्रातील मंदिरातही घोटाळा, ६० कोटींचा गैरव्यवहार उघड, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, पेपरफुटी रोखणे ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही, तर सर्व राज्य सरकारांना आणि पक्षांना एकत्र येऊन यासाठी लढा द्यावा लागेल. दरम्यान, सोमवारी पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी हजारो आंदोलकांनी जंतरमंतर दे संसद अशी निदर्शने केली होती.

PM Narendra Modi on Neet
Gold Rate Today : सोनं खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ आणि १८ कॅरेटचा आजचा भाव काय?

पेपरफुटीची बातमी समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई केली आणि १३ जणांना अटक करून तुरुंगात पाठवले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी नीटच्या फेरपरीक्षेला प्राधान्य देण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाल्याचे रिजिजू यांनी सांगितले. नीट परीक्षेसंदर्भात पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की, पेपरफुटीची बातमी समोर येताच सरकारने तात्काळ कारवाई केली आणि १३ जणांना तुरुंगात टाकले. इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी नीटच्या फेरपरीक्षेला प्राधान्य देण्यात आले, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com