Gold Rate Today : सोनं खरेदीदारांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; २४, २२ आणि १८ कॅरेटचा आजचा भाव काय?

Gold Rate Today Mumbai Pune : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर, मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि इतर प्रमुख शहरांतील आजचे भाव जाणून घ्या.
Gold Rate Today:
Gold Price Today saam tv
Published On

Gold Prices Surge Amid Global Uncertainty: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण पुन्हा एकदा आखाती देशात युद्धाचे ढग गडद झाल्यानंतर सोन्याच्या मागणीत वाढ झाली अन् दरही वाढले. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशातील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७६० रूपयांनी वाढले आहे. तर २२ कॅरेटचे सोनं प्रति तोळा ७०० रूपयांनी महागले आहे. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली कोलकाता अन् राजस्थानपर्यंत सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आज तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर दर पाहूनच खरेदीसाठी जा..

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांतील चढ-उतारानंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (Pure Gold)

२४ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति ग्रॅम ७६ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १४,४२२ रुपये झाला आहे. तर १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत १,४४,२२० रुपये (७६० रुपयांची वाढ) इतकी पोहोचली आहे. तसेच १०० ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना १४,४२,२०० रुपये मोजावे लागत आहेत.

Gold Rate Today:
बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट; दरड कोसळून ७ जणांचा दुर्दैवी अंत, जमिनीखाली २७ मजूर अडकले

२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव

दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ७० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम १३,२२० रुपयांवर पोहोचले आहे. तर प्रति तोळा ७०० रूपयांची वाढ झाल्याने खरेदीसाठी १,३२,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.

त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५७ रुपयांची वाढ झाली असून, १ ग्रॅमचा भाव १०,८१६ रुपये झाला आहे. १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर १,०८,१६० रुपये (५७० रुपयांची वाढ) झाला आहे.

Gold Rate Today:
महाराष्ट्रातील मंदिरातही घोटाळा, ६० कोटींचा गैरव्यवहार उघड, महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

तुमच्या शहरात सोन्याचे दर काय आहेत?

चेन्नई

२४ कॅरेट - ₹१४,३४७

२२ कॅरेट - ₹१३,१५१

१८ कॅरेट - ₹१०,९६६

मुंबई

२४ कॅरेट - ₹१४,४२२

२२ कॅरेट - ₹१३,२२०

१८ कॅरेट - ₹१०,८१६

दिल्ली

२४ कॅरेट - ₹१४,४३७

२२ कॅरेट - ₹१३,२३५

१८ कॅरेट - ₹१०,८३१

कोलकाता

२४ कॅरेट - ₹१४,४२२

२२ कॅरेट - ₹१३,२२०

१८ कॅरेट - ₹१०,८१६

बेंगळुरू

२४ कॅरेट - ₹१४,४२२

२२ कॅरेट - ₹१३,२२०

१८ कॅरेट - ₹१०,८१६

हैदराबाद

२४ कॅरेट - ₹१४,४२२

२२ कॅरेट - ₹१३,२२०

१८ कॅरेट - ₹१०,८१६

पुणे

२४ कॅरेट - ₹१४,४२२

२२ कॅरेट - ₹१३,२२०

१८ कॅरेट - ₹१०,८१६

अहमदाबाद

२४ कॅरेट - ₹१४,४२७

२२ कॅरेट - ₹१३,२२५

१८ कॅरेट - ₹१०,८२१

Summary

वरील दिलेले सोन्याचे दर हे केवळ सूचक (Indicative) आहेत. या दरांमध्ये जीएसटी (GST), टीसीएस (TCS) आणि इतर स्थानिक करांचा (Local Levies) समावेश नाही. त्यामुळे दागिने खरेदी करताना तुमच्या स्थानिक सराफा दुकानात नक्की दर तपासून घ्यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com