बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट; दरड कोसळून ७ जणांचा दुर्दैवी अंत, जमिनीखाली २७ मजूर अडकले

Sikkim tunnel landslide : सिक्कीममधील नामची जिल्ह्यात तिस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट होऊन दरड कोसळली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून २७ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Sikkim tunnel landslide
Sikkim tunnel landslideSaam TV
Published On

Sikkim tunnel accident Death Toll : सिक्कीममधील नामची जिल्ह्यात एका निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात भीषण दुर्घटना घडली आहे. 'तिस्ता स्टेज-६' प्रकल्पाच्या बोगद्यात मिथेन गॅसचा जोरदार स्फोट झाला, त्यानंतर अचानक दरड कोसळल्याने तब्बल २७ कामगार आत अडकले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दुर्दैवाने ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहितीही मिळाली आहे.आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

७ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. उर्वरित कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF, SDRF, पोलीस, अग्निशामक दल आणि आरोग्य विभागाच्या टीम्स युद्धपातळीवर बचावकार्य राबवत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आतमध्ये अडकलेल्यांमध्ये काही इंजिनिअरचाही समावेश आहे.

Sikkim tunnel landslide
Maharashtra Weather : मुंबई, पुण्यात मुसळधार तर मराठवाड्यात विजांचा कडकडाट! आज महाराष्ट्रात पावसाचा कसा आहे अंदाज?

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. बोगद्याच्या आत अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आतमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर सध्या विशेष भर दिला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सर्व कामगार सुखरूप बाहेर यावेत यासाठी स्थानिक नागरिक आणि कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.

Sikkim tunnel landslide
नवी मुंबई हादरली! लॉजच्या नावावर देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांच्या जाळ्यात अडकले व्यवस्थापक अन् वेटर

जखमींसाठी रुग्णवाहिका सज्ज, चौकशीचे आदेश

सध्या प्रशासनाकडून बोगद्यात अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाचवलेल्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. प्राण गमावलेल्या सात कामगारांचे मृतदेह सिंगताम जिल्हा रुग्णालय, एसटीएनएम रुग्णालय (गंगटोक) आणि नामची जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यावर सखोल चौकशी केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com