नवी मुंबई हादरली! लॉजच्या नावावर देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांच्या जाळ्यात अडकले व्यवस्थापक अन् वेटर

Navi Mumbai Police Bust Alleged Sex Trafficking Racket : नवी मुंबईतील तळोजा परिसरातील एका लॉजवर एएचटीयूने टाकलेल्या छाप्यात ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली.
High-Profile Sex Trafficking Racket
High-Profile Sex Trafficking RacketSaam
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Navi Mumbai Taloja Crime News : 'लॉजिंग आणि बोर्डिंग'च्या नावाखाली महिलांचा देहविक्रीसाठी वापर करणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे AHTU पथकाने बनावट गिऱ्हाईक पाठवून टाकलेल्या छाप्यात ९ महिलांची नरकयातनेतून सुटका करण्यात आली. अवघ्या काही हजारांच्या व्यवहारासाठी महिलांचा सौदा करणाऱ्या लॉज व्यवस्थापकासह तिघांना तळोजा पोलिसांनी गजाआड केले आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) मोठी कारवाई करत वेश्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या ९ पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

High-Profile Sex Trafficking Racket
Horoscope : शनिदेवाची कृपा होणार! २७ जुलैपासून ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचा योग

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला १८ जुलै रोजी 'हॉटेल अबोड इन, लॉजिंग अँड बोर्डिंग' येथे महिलांना डांबून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. बनावट ग्राहकाचा इशारा मिळताच पथकाने लॉजवर छापा टाकला असता, तेथे ९ पीडित महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची तत्काळ सुटका केली.

High-Profile Sex Trafficking Racket
Pune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल, जड वाहनांना शहरात बंदी; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

या तपासात लॉज व्यवस्थापक बलराम नंजय गोडा, वेटर गिरीश शेखर पुजारी आणि वेटर कृष्णराज रितेशकुमार पाटील हे तिघे महिलांना ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी बनावट ग्राहकाकडून या व्यवसायासाठी ३,००० रुपये स्वीकारल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपींना १९ जुलै रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com