Pune Traffic update : शहरात पावसाळ्यात जड वाहने, मालवाहु वाहने अडकण्याच्या किंवा बंद पडण्याच्या घटना घडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ९ जुलै पासून पुढील आदेशापर्यंत जड-अवजड वाहनांस प्रवेश बंदी केली आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव-चौफुला-न्हावरे-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण मार्गे व उरळी कांचन-कोरेगाव मुल –अष्टापुर–तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण मार्गे जावे.
मुंबई येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे-केडगाव-चौफुला सोलापूर महामार्ग मार्गे व तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-आष्टापूर-कोरेगाव मुल-उरळी कांचन मार्गे तसेच कात्रज मंतरवाडी फाटा-वडकी-दिवेघट-सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव चौफुला मार्गाचा वापर करावा.
मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अहिल्यानगर मार्गाचा वापर करावा. तर अहिल्यानगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी शिक्रापूर –चाकण-तळेगाव मार्गाचा वापर करावा.
सासवड येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव-चौफुला मार्गाचा वापर करावा.
शहरात मालाची चढ-उतार करणाऱ्या वाहनांनी रात्री ११ ते सकाळी ६ वा. पर्यंत खालील मार्गाने ये-जा करावी. अहिल्यानगर कडून पुणे शहरात येणाऱ्या वाहनांनी नगर रोडने वाघोली-खराडी बायपास- शास्त्रीनगर चौक-गोल्फ क्लब चौक-आळंदी रोड जंक्शन-चंद्रमा चौक-पोल्ट्री चौक-हॅरीश ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.
सोलापूरकडून पुणे शहरात ये-जा करण्यासाठी मगरपट्टा-भैरोबानाला-लुल्ला नगर चौक- गंगाधाम चौक-मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा.
सातारा- सांगली -कोल्हापूरकडे जाणारी वाहने बेंगळुरू महामार्गमार्गे, नवले ब्रिज, कात्रज चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील. तर मुंबई-नाशिक कडून पुणे शहरात येणारी वाहने हॅरिश ब्रिज-बोपोडी-चंद्रमा-गोल्फ चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.