Toxic Gas : धक्कादायक! वासाराचा जीव वाचवताना ४ जणांवर काळाचा घाला, विहिरीतील विषारी वायूने घेतला बळी

Toxic Gas Accident : हरियाणातील झज्जर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेल्या चार जणांचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. बचावकार्यादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्यालाही श्वास घेण्यास त्रास झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Toxic Gas Accident
Toxic Gas Accident
Published On

Jhajjar Haryana well toxic gas incident : एका निष्पाप वासराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात हरियाणात ४ जणांचा करुण अंत झाल्याची घटना समोर आली आहे. एका विहिरीत पडलेल्या वासराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काही लोक एकापाठोपाठ एक विहिरीत उतरले. मात्र, विहिरीच्या तळाशी साचलेल्या अत्यंत विषारी वायूमुळे (Toxic Gas) त्यांचा श्वास गुदमरला आणि चारही जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

विहिरीतून कोणीही बाहेर येत नसल्याचे पाहून गावकरी मदतीसाठी धावले, पण आत वायू इतका घातक होता की कोणालाही काही समजायच्या आत मोठा अनर्थ घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवताना ४ जणांनी आपला जीव गमावल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

Toxic Gas Accident
Daily Horoscope : ५ राशींवर भोलेनाथांची कृपा! प्रचंड पैसा मिळणार अन् मोठे यश; वाचा सोमवारचे राशिभविष्य

हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात सोमवारी एका वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरल्याने चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना मुनिमपूर गावात घडली. प्राथमिक माहितीनुसार, एक वासरू विहिरीत पडले होते. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात काहीजण एकामागून एक विहिरीत उतरले. पण बंद विहिरीत तयार झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने ते बेशुद्ध झाले आणि बाहेर येऊ शकले नाहीत, त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दलबीर (४०), नरेंद्र (३८), मोनू (३६) आणि रामू (४०) यांचा समावेश आहे.

Toxic Gas Accident
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. राजश्री घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सांगितले की, कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार पुढील कारवाई केली जात आहे.बचाव कार्यादरम्यान, उपनिरीक्षक राजेश कुमार यांनीही अडकलेल्यांना वाचवण्यासाठी विहिरीत प्रवेश केला. त्याच धोकादायक वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास तीव्र त्रास होऊ लागला. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Toxic Gas Accident
भाडेकरू घर रिकामं करत नाहीये? नव्या कायद्यानुसार 'या' ५ कारणांवरून मालक थेट बाहेर काढू शकतात; पाहा काय आहेत नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com