Daily Horoscope : ५ राशींवर भोलेनाथांची कृपा! प्रचंड पैसा मिळणार अन् मोठे यश; वाचा सोमवारचे राशिभविष्य

Today Horoscope in Marathi : सोमवारी भगवान शंकरांच्या कृपेने वृषभ, सिंह, तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना यश मिळण्याची संकेत आहेत. जाणून घ्या सोमवारचे संपूर्ण राशिभविष्य.
Today Horoscope in Marathi
Today Horoscope in Marathi
Published On

Monday horoscope for all zodiac signs : सोमवार हा भगवान शंकराचा म्हणजेच भोलेनाथांचा वार मानला जातो. आज ग्रहांची नक्षत्रे आणि सोमवारचा विशेष योग जुळून आल्यामुळे भोलेनाथांच्या आशीर्वादाने ५ राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे. या भाग्यवान राशींना आज आर्थिक लाभ, रखडलेला पैसा आणि करिअरमध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या जातकांवर आज भोलेनाथांची अफाट कृपा असणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे आज कोणत्याही अडथळ्याशिवाय मार्गी लागतील. आर्थिक बाजू अत्यंत भक्कम होईल. जुनी दिलेली उधार किंवा अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरेल. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा आज शिखरावर असेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये मोठा धनलाभ होईल. व्यापारी वर्गाला आज अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मोठी संधी मिळेल.

तूळ (Libra)

तूळ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस पैशांच्या बाबतीत अत्यंत लकी ठरणार आहे. भोलेनाथांच्या कृपेने तुमची आर्थिक चणचण कायमची दूर होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांच्या सहकार्याने एखादा मोठा प्रकल्प यशस्वी पूर्ण होईल.

Today Horoscope in Marathi
भाडेकरू घर रिकामं करत नाहीये? नव्या कायद्यानुसार 'या' ५ कारणांवरून मालक थेट बाहेर काढू शकतात; पाहा काय आहेत नियम

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रत्येक क्षेत्रात यश देणारा ठरेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सुवर्णकाळ ठरेल. अडकलेला पैसा मिळाल्याने बँक बॅलन्स वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे, यामध्ये मोठा आर्थिक फायदा होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधूर होतील आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

मीन (Pisces)

मीन राशीच्या जातकांवर आज महादेवाची विशेष मेहेरबानी असणार आहे. कोर्ट-कचेरी किंवा मालमत्तेच्या वादात तुमचा विजय निश्चित आहे. नोकरीमध्ये मोठी जबाबदारी किंवा बढती मिळण्याचे संकेत आहेत. रखडलेले जुने व्यवहार पूर्ण झाल्यामुळे मोठी आर्थिक चिंता मिटेल. जुना सुरू असलेला आजार बरा होईल, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल.

Today Horoscope in Marathi
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

महत्त्वाची टीप (Disclaimer):

सदर राशिभविष्यात दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारवर आहे. यामध्ये कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा दावा करण्याचा हेतू नाही. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ एक संदर्भ म्हणून करावा. कोणत्याही आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णयापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com