महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

Laxman Hake, OBC Janata Party : ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बारामतीत 'ओबीसी जनता पार्टी' या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. भाजपसह प्रस्थापित पक्षांवर टीका केली आणि आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी भूमिका घेण्याचे संकेत दिले.
Laxman Hake, OBC Janata Party
Laxman Hake, OBC Janata PartySaam TV marathi
Published On

मंगेश कचरे, बारामती प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Laxman Hake, OBC Janata Party : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ओबीसी आंदोलनाचे प्रमुख चेहरे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राज्यात एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी 'ओबीसी जनता पार्टी' स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही ६० टक्के ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केला. "आता महाराष्ट्रात आमचे कोणीच उरले नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत," असे म्हणत त्यांनी थेट प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. हा नवा पक्ष कोणत्याही कारखानदार किंवा नेत्यासाठी नसून सर्वसामान्य ओबीसी, एससी आणि एसटी बांधवांच्या हक्कासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी काम करेल, अशी घोषणा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Laxman Hake, OBC Janata Party
भाडेकरू घर रिकामं करत नाहीये? नव्या कायद्यानुसार 'या' ५ कारणांवरून मालक थेट बाहेर काढू शकतात; पाहा काय आहेत नियम

पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी भारतीय जनता पार्टीवर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली. "ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असे सांगत त्यांनी आमची मते घेतली. पण आता भाजपचा डीएनए ओबीसी उरला नसून तो 'प्रसाद लाड' झाला आहे," असा थेट टोला त्यांनी लगावला. शासनाच्या एक लाख नोकऱ्या प्रसाद लाड यांच्या खासगी कंपन्यांमार्फत चालवल्या जात असल्याचा आरोप केला. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील भाजप आणि आजची 'फोडाफोडी' करणारी भाजप यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Laxman Hake, OBC Janata Party
IMD Red Alert : महाराष्ट्रातही पाऊस धुमाकूळ घालणार? 'या' राज्यांना IMD चा मोठा इशारा, पाहा तुमच्या शहरात काय होणार

अधिवेशनात ओबीसींच्या प्रश्नांचा गळा घोटला

महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ६० टक्के ओबीसींच्या आरक्षणावर आणि प्रश्नांवर एकही चर्चा झाली नाही, याबद्दल हाकेंनी संताप व्यक्त केला. तुम्ही सभागृहात ओबीसींसाठी कोणता प्रश्न मांडला? तुमचे उत्तर असेल तर मी आरोप मागे घेतो असे ते म्हणाले. जात पडताळणीच्या (Cast Validity) मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ओबीसी मुलांना केवळ ४ दिवसांचा वेळ दिला जातो, तर जरांगे पाटलांच्या कृपेने येणाऱ्या नवीन लोकांना ६ महिन्यांची मुदत दिली जाते, असा दुजाभाव करणारा जीआर कसा निघू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Laxman Hake, OBC Janata Party
Pune BJP : उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का, विश्वासू शिलेदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

निवडणुकीवर प्रभाव टाकणार, बारामतीतून थेट लढ्याचे संकेत

बारामतीतून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, "मला माझ्या गुरूने (गोपीनाथ मुंडे) नेहमी 'हिंदकेसरी'शी लढण्याचा मंत्र दिला आहे. यापूर्वी माघार घेतली म्हणजे पुढे लढणार नाही असे नाही. आम्ही आगामी कालावधीत निवडणुकीवर थेट प्रभाव टाकणारी भूमिका घेऊ आणि खरा ओबीसी प्रतिनिधी काय असतो हे दाखवून देऊ." ही पार्टी कोणाला आमदार-खासदार करण्यासाठी नसून लोकशाही वाचवण्यासाठी काम करेल, असे हाके यांनी शेवटी स्पष्ट केले.

Laxman Hake, OBC Janata Party
Accident : महामार्गावर अपघाताचा थरार, कार आणि ट्रकची जोरात धडक, चौघांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com