सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच राहणार; जो पर्यंत... हॉस्पिटलमधून लिहिलेल्या पत्राद्वारे केली मोठी मागणी

Sonam Wangchuk Hunger Strike Latest Update Day 23: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना संसदेत खासदारांना भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Sonam Wangchuk continues his hunger strike from Safdarjung Hospital, demanding that protesting students be allowed to present their concerns before Members of Parliament.
Sonam Wangchuk continues his hunger strike from Safdarjung Hospital, demanding that protesting students be allowed to present their concerns before Members of Parliament.saam tv
Published On

दिल्लीतील सफरदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सोनम वांगचुक यांनी सुरू केलेले उपोषण अद्यापही संपलेले नाही. उपोषणाच्या 23 व्या दिवशीही त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला असून रुग्णालयातूनच पत्र लिहून सर्व अफवांना त्यांनी फेटाळून लावले आहे. रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी आंदोलन करणाऱ्या तरूणांवर होत असलेल्या वागणुकीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, जो पर्यंत तरुणांना लोकसभेत खासदारांना भेटू देण्याची मागणी मान्य होत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरूच राहील.

Sonam Wangchuk continues his hunger strike from Safdarjung Hospital, demanding that protesting students be allowed to present their concerns before Members of Parliament.
दिल्लीत आंदोलन भडकले! लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर, अनेक विद्यार्थी बेशुद्ध; संसदेच्या दारात पोलिसांचा बळाचा वापर

दिल्लीत NEET पेपेरफुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते संसद परिसरात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी पत्रात नमूद केल की, विद्यार्थ्यांवर इतका लाठीचार्ज होऊनही त्यांनी शांततेत आंदोलन केले. याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी सरकार आणि पोलिसांना आवाहन केले की, विद्यार्थ्यांना आज किंवा उद्या संसदेसमोर आपली बाजू मांडण्याची परवानगी द्यावी, ज्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघू शकतो.

Sonam Wangchuk continues his hunger strike from Safdarjung Hospital, demanding that protesting students be allowed to present their concerns before Members of Parliament.
वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी हे उपोषण सुरू केले आहे. ते CJP आंदोलनाशी जोडले गेले असून विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांना त्यांनी स्वतःचा मुद्दा बनवले आहे. उपोषणाच्या 23 दिवसांत त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे, तरीही त्यांचा निर्धार कायम आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर होत असलेल्या वागणुकीमुळेच उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Sonam Wangchuk continues his hunger strike from Safdarjung Hospital, demanding that protesting students be allowed to present their concerns before Members of Parliament.
दिल्लीत आंदोलन भडकले! लाठीचार्ज अन् अश्रुधुराचा वापर, अनेक विद्यार्थी बेशुद्ध; संसदेच्या दारात पोलिसांचा बळाचा वापर

उद्याही तसाच संयम राखू

वांगचुक यांनी अपेक्षा व्यक्त केली की, सरकार लवकरच शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या जबाबदारी जाणीव करून देईल. त्यांनी तरुणांच्या संयमाचे कौतुक करत म्हटले की, ते उद्याही आजप्रमाणेच शांतता आणि धैर्य दाखवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com