इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार

Trump Escalates Tensions: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आरपारची लढाई करण्याचा चंग बांधलाय...होर्मुझमध्ये इराणच्या सहा युद्धनौका उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. तर दुसरीकडे इराणने हे वृत्त फेटाळून लावलंय. दरम्यान,युद्धबंदीच्या घोषणेनंतर होर्मुझमध्ये नेमकं काय घडतंय?
US naval presence intensifies in the Strait of Hormuz amid rising tensions with Iran following disputed strike claims.
US naval presence intensifies in the Strait of Hormuz amid rising tensions with Iran following disputed strike claims.saam tv
Published On

आखाती युद्ध गेल्या काही दिवसांपासून शांत झालेले असतांना युद्धखोर भूमिका घेतलेल्या ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगावर संकट निर्माण करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. वारंवार भूमिका बदलणाऱ्या ट्रम्प यांनी आता थेट इराणला नकाशावरून मिटवून टाकू अशी धमकी दिलीये. एवढंच नव्हे तर होर्मुझमध्ये असलेल्या इराणच्या सहा युद्ध नौकाही अमेरिकेनं उडवून दिल्या आहेत. मात्र आयआरजीसीनं हा दावा फेटाळलाय. होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षा पुरवण्याचं काम अमेरिकन नौदल करत आहे. त्यांना टार्गेट केलं तर आम्ही प्रोजेक्ट फ्रीडम आणखीन तीव्र करु असा इशारा ट्रम्पनं दिलाय. अमेरिकेनं प्रोजेक्ट फ्रीडम कसं राबवलं पाहा.

प्रोजेक्ट फ्रीडम ऑपरेशनमध्ये 15000 अमेरिकी सैनिक, अमेरिकी नौदलाची विनाशिका, 100 हून अधिक लढाऊ विमाने, पाणबुड्यांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकी कमांडर्सकडे होर्मुझमधील व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार आहेत. खरंतर, या ऑपरेशनचा उद्देश इराणी भूसुरुंगांचा मार्ग मोकळा करणे हा आहे.

आता ट्रम्प यांच्या या धमकीला इराण कसं उत्तर देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय. परंतू 'प्रोजेक्ट फ्रीडम'च्या माध्यमातून ट्रम्प यांचा होर्मुझमध्ये इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सफल होतो की इराण अमेरिकेच्या या मोहिमेला सडेतोड उत्तर देते हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com