दिल्ली पोलिसांनी गुप्तपणे सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केलं. पण हे आंदोलन आता संपलेलं नाही, तर आंदोलनाची तीव्रता आणखी वाढलीय... वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर आता जंतर-मंतरवर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारला दिलाय...
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांच्या या दडपशाहीवर आता अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय. तसचं जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं...
दरम्यान वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर
शरद पवारांसह उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकरावर हल्लाबोल केलाय... अजून किती जणांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार आहे असा सवाल त्यांनी केलाय... तर राजीनाम्यासाठी उपोषण करणं योग्य नाही असं विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी केलंय...
दरम्यान सरकारकडून वांरवार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होणार असल्याचं सांगत अभिजित दिपकेंनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देतानाच क्रॉकोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय आव्हानं केलयं..ऐका...
एकंदरित सोनम वांगचुक यांना उचलून नेल्यानंतरही अभिजित दिपके कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुढे घेऊन जाणार आहेत... मात्र जर भविष्यात दिपकेंना अटक झाली तर देशभरात ठिकठिकाणी CJPचे कार्यकर्ते आंदोलनाचा पवित्रा घेतील हे निश्चित...मात्र वांगचुक यांचं 21 दिवसांच उपोषण अशा पध्दतीने दडपणाऱ्या या व्यवस्थेला दिपकेंच्या आंदोलनाचं काही सोयरसुतक असेल का? हाच खरा सवाल आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.