सौर वादळ पृथ्वीवर धडकणार? सूर्यावरील स्फोटानंतर 'नासा'चा इशारा, VIDEO

NASA warning : पृथ्वीच्या दिशेने सौरवादळ झेपावतंय. सूर्याच्या पृष्ठभागावर झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे हे सौरवादळ निर्माण झालंय. नासाकडून काय इशारा देण्यात आलाय ? पाहूया एक रिपोर्ट
Earth solar storm
NASA warningSaam tv
Published On

सूर्याच्या पृष्ठभागावरील एका स्फोटामुळे निर्माण झालेले एक जी-थ्री जिओमॅग्नेटिक म्हणजेच एक शक्तिशाली चुंबकीय वादळ पृथ्वीच्या दिशेने सरकत आहे. अद्भूत आणि विध्वसंक असे याचे दोन्ही परिणाम दिसणार आहे. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये 'नॉर्दर्न लाइट्स' म्हणजेच अद्भूत प्रकाश दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सूर्याच्या पृष्ठभागावर गेले आठवडाभर होत असलेल्या तीव्र स्फोटांमुळे चुंबकीय वायूंचे प्रचंड लोट वेगाने अवकाशात फेकले जात आहेत. नासा आणि 'स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर'ने या घटनेबाबत गंभीर इशारा दिला आहे.

अंतराळ हवामान संस्थांनी 'G3' श्रेणीतील भू-चुंबकीय वादळाची घोषणा केली आहे. उच्च चुंबकीय गुणधर्म असलेला 'फिलामेंट' बाहेर फेकला गेला. हा फिलामेंट सध्या आपल्या अंतर्गत सूर्यमालेतून प्रवास करतोय. तो प्रति सेकंद 1400 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने थेट पृथ्वीच्या दिशेने येत आहे.

या सौर वादळाची उल्लेखनीय बाब म्हणजे, त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारत, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या आकाशात एक अद्वितीय आणि तेजस्वी दृश्य निर्माण होऊ शकते. ज्याला वैज्ञानिक भाषेत 'ऑरोरा' किंवा 'नॉर्दर्न लाइट्स' असे म्हटले जाते.

Earth solar storm
Aliens Exist on Earth: 'पृथ्वीवर एलियन्स अस्तित्वात? बराक ओबामांचा खळबळजनक दावा

सूर्यावरून अचानक होणाऱ्या मोठ्या उद्रेकांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आणि वातावरणावर प्रचंड परिणाम होतो. यामुळे पृथ्वीवरील दळणवळण यंत्रणा, उपग्रह आणि वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड्स विस्कळीत होऊ शकतात.

सूर्याच्या पृष्ठभागावर ६ जून ला सकाळी हा स्फोट झालाय. शास्त्रज्ञांनी या स्फोटाचे वर्गीकरण 'M1.8' श्रेणीतील सौलर फायर म्हणजेच 'सौर ज्वाळा' म्हणून केले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा' आपल्या 'हेलिओफिजिक्स' विभागांतर्गत अंतराळातील हवामानाचा सखोल अभ्यास करत आहे.

Earth solar storm
वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

या संशोधन मोहिमेचा एक भाग म्हणून नासाचे 'हर्मिस' हे अत्याधुनिक उपकरण चंद्राच्या कक्षेत उभारल्या जाणाऱ्या 'गेटवे' या अंतराळ स्थानकावर बसवले जाणार आहे. दरम्यान, सौर वादळामुळे पृथ्वीला काही नुकसान तर होणार नाही ना यावर शास्त्रज्ञ संशोधन करत असताना सामान्य जनतेत मात्र आकाशात नेत्रदीपक, अद्भूत प्रकाश कधी दिसणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com