
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घरातील फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील भाडेकरूला खोलीतून उग्र वास येऊ लागला, त्याने तातडीने याची माहिती घरमालकाला दिली. घरातील दुसऱ्या भागातील खोलीची तपासणी केली असता, फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आलाय. घरमालकाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस या घटनेचा करीत आहेत. दरम्यान, आरोपी पूर्व भाडेकरू असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलीस तपासादरम्यान, घराचे पूर्व भाडेकरू संजय पाटीदार यांनी जून महिन्यात घर रिकामे केले होते. त्या आधी संजय पाटीदार भाडेकरू म्हणून राहत होते. पण घर रिकामे करण्यापूर्वी संजय यांनी काही वस्तू खोलीतच ठेवल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात फ्रिजसह काही वस्तूंचा समावेश आहे. भाडेकरू याने ज्या वस्तू ठेवल्या, त्याच फ्रिजमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संशयाची सुई पूर्व भाडेकरूडे वळत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
घराच्या दुसऱ्या भागात आपल्या कुटुंबासह राहणारे भाडेकरू बलवीर सिंग म्हणाले, खोलीत अचानक दुर्गंधी येऊ लागली होती. दुर्गंधी इतकी तीव्र होती की श्वास घेण्यासही आम्हाला त्रास व्हायचा. म्हणून याची माहिती घरमालकाला दिली. तेव्हा फ्रिजमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेचे गांभिऱ्य लक्षात घेता पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या टीमला बोलावून घेतले. त्यांनी खोलीची बारकाईने तपासणी केली.
फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या टीमने तपासणी केली असता, त्यांना एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महिलेची ओळख आणि हत्येमागील कारणे शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस स्थानिक रहिवासी आणि घरमालकाची चौकशी करीत असून, संजय पाटीदार आणि मृत महिलेचे काही संबंध होते का? याचा देखील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.