Family Killed: आधी ३ मुलींना संपवलं, मृतदेह पलंगात टाकलं; आई वडीलांनाही सोडलं नाही, कुटुंबाचा कुणी केला घात?

Family Killed News: उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने मोईन आणि त्याच्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली आणि मुलींनाही ठार केलं.
Crime News
Crime NewsSaam Tv News
Published On

घराच्या गेटला कुलूप, २ दिवस घरातून कुणीही बाहेर पडताना दिसले नाही. नातेवाईक फोन करत होते, पण घरात कुणीही फोन उचलत नव्हते. नातेवाईकांनी घर गाठलं, मात्र घरात शिरताच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळले. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये घडली असून, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ माजली आहे.

उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आरोपीने मोईन आणि त्याच्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली. नंतर त्यांचा मृतदेह पोत्यात भरून बेडवर ठेवले होते. नंतर त्यांच्या मुलीचे मृतदेह त्याच खोलीतील बेडमधील बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये मृत मोईन हे मिस्त्री म्हणून काम करत होते. या घटनेनंतर मारेकऱ्यानं घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला आहे.

Crime News
Criminal Arrested: जेलमधून बाहेर येताच जंगी सेलिब्रेशन, रॅली काढताच पोलिसांनी पुन्हा टाकलं आत

गुरूवारी सायंकाळी मयत मोईनचा भाऊ सलीम घरी आला होता. घरी पोहोचल्यानंतर दाराला लावलेले दिसले, शेजाऱ्यांना यासंदर्भात विचारले असता, बुधवारपासून कुणीही घराबाहेर आले नसल्याचं त्यांनी सांगितलं. नंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा ही हत्याकांड उघडकीस आली.

Crime News
Minor Girls Escape: खिडकीच्या जाळ्या तोडून ८ मुलींनी ठोकली धूम, शासकीय निरीक्षणगृहातील मुली पळाल्या

सर्व सामान जमिनीवर पसरलेले होते. कपडे आणि बेडशीच विखुरलेले होते. खोलीत रक्ताच्या थारोळ्याने माखलेले मृतदेह पाहून घरात दरोड्याचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर सील केला असून, फॉरेन्सीक टीम या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पत्नी अस्माचा भाऊ अमजद याने सांगितले की, मोईनने त्याच्या भावांना ४ लाख रूपये दिले होते. मात्र, वारंवार विनंती करूनही ते पैसे परत करत नव्हते. या दृष्टीकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी मोईनच्या भावांचीही चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com