Criminal Arrested: जेलमधून बाहेर येताच जंगी सेलिब्रेशन, रॅली काढताच पोलिसांनी पुन्हा टाकलं आत

Criminal Arrested Pune Police News: येरवडा कारागृहातून मोक्काच्या गुन्ह्यातून बाहेर सुटताच गुन्हेगाराची चारचाकी आणि दुचाकीवरून रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणी रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.
pune Crime
pune CrimeSaam Tv News
Published On

पुण्यातील येरवडा कारागृहातून मोक्काच्या गुन्ह्यातून बाहेर सुटताच, गुन्हेगाराची चारचाकी आणि दुचाकीवरून रॅली काढणं चांगलंच भोवलं आहे. रॅली काढल्यामुळे परिसरात खळबळ माजली असून, या प्रकरणी रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. या रॅली काढणार्‍या गुन्हेगारांसह, तब्बल ४० साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पण पुण्यात सध्या एका आरोपीच्या जंगी स्वागताची चर्चा होत आहे. प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे याच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल होता. तो या गुन्ह्यातून जामीनावर सुटला. जामिनीवर सुटल्यानंतर त्याच्या साथीदाराने जंगी स्वागत केलं. २०-३० दुचाकी आणि चारचाकीवरून रॅली काढली. यात ४०-५० जण सहभागी असल्याची माहिती आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खूप खळबळ माजली होती.

pune Crime
Shocking Crime: विकृतीचा कळस! मित्रांना बायकोवर बलात्कार करायला सांगायचा, नवरा लाईव्ह व्हिडिओ बघायचा

या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेत गुन्हा दाखल केला. या रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल ५० साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबे हा जामीनावर सुटल्यावर येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी आला होता. मात्र, त्याच वेळेत एका कॉल सेंटरमधील तरूणीच्या हत्येची घटना घडली. यामुळे बहुतांश स्टाफ आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी होते. यामुळे कसबे पोलीस स्टेशनबाहेर पडला आणि त्याची रॅली काढण्यात आली.

pune Crime
Accident News: भीषण! ड्रायव्हर मोबाइल फोनवर बोलण्यात गुंग, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवरील कंट्रोल सुटला अन्...

मात्र, रॅली काढणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला असून, रॅली काढणाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे, दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे व इतर ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com