Accident News: भीषण! ड्रायव्हर मोबाइल फोनवर बोलण्यात गुंग, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसवरील कंट्रोल सुटला अन्...

Bus Accident in Sangamner: कुर्लातील झालेला भीषण अपघातामुळे राज्यभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. अशातच शिर्डीत एका बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थी होते.
Bus Accident
Students Bus AccidentSaam Tv News
Published On

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाला आहे. चालक मोबाईल फोनवर बोलत होता. अचानक बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस विजेच्या खांबाला धडकली. ज्यामुळे बस जागीच पलटी झाली. सुदैवाने कुणाचा अपघात झाला नाही. विद्यार्थी सुखरूप आहेत.

कुर्लातील झालेल्या भीषण अपघातामुळे राज्यभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. अशातच शिर्डीत एका बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे बसचा भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थी असून, ही शाळेची बस असल्याची माहिती आहे. बसची विजेच्या खांबाला धडक बसली. ज्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले होते. ज्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे.

Bus Accident
Kalyan Accident : लग्नानंतर १५ वर्षांनी मूल झालं, रस्ता ओलांडताना मायलेकाचा मृत्यू; हृदय पिळवटून टाकणारी घटना

सावरगावतळ गावातील श्री श्री रवीशंकर इंग्लिश स्कुलच्या बसचा ९ डिसेंबरला सकाळी अपघात झाला. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना जिव गमवावा लागला असता. पण सुदैवाने विद्यार्थ्यांनी भरलेली बसच्या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. नियमित या शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडते.

Bus Accident
Student gives birth: भयंकर घटना! शाळेतच दिला मुलीला जन्म, नंतर खिडकीतून खाली फेकलं

मात्र, आज चालक मोबाईलवर बोलत असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे ती थेट विजेच्या खांबाला धडकली. विजेच्या खांबाला धडकल्यामुळे बस जागीच पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांनी बसमधील मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेनंतर एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

शाळा व्यवस्थापन चक्क खाजगी बस वापरत असून नियमांची पायमल्ली केले जात आहे. तरीही शिक्षण प्रशासन शिक्षण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनासह बसचालकावर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी मागणी पालकांनी केली आहे. आता लवकर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com