Shocking Video: धावती ट्रेन पकडणं अंगलट, तरुण मरता-मरता वाचला; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Viral Video: रेल्वेचा प्रवास करताना अनेकांनी निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Shocking Video
Viral VideoSaam Tv
Published On

Shocking Accident Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम अपघांताच्या घटना पाहण्यास मिळतात. त्यातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले आहे. ज्यात धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात व्यक्तीला जीव गमावावा लागला असता मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे थोडक्यात प्राण वाचले आहे. रेल्वे स्टेशनवरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली असून सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसत आहे. त्यानंतर या रेल्वे स्टेशनवरील एक प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्वर काहीच प्रवाशांची येजा होत आहे. या दरम्यान या प्लॅटफॉर्मवरुन एक एक्सप्रेस ट्रेन निघाली असते. जिचा वेग जोरात आहे. दरम्यान काही व्यक्ती धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती सुरक्षितरित्या ट्रेनमध्ये चढतात मात्र बाकी व्यक्ती सोबत एक निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला व्यक्ती तिथे येतो आणि घाई-घाईत धावती ट्रेन(Train) पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र ट्रेनमध्ये चढत असताना त्याचा तोल जातो.

परंतू ट्रेनच्या बाजूला असलेल्या एक पोलिस कर्मचारी त्या व्यक्तीला पडताना वाचवण्यास जातो. पोलिस कर्मचाऱ्याच्या सर्तकेमुळे तो व्यक्ती धावत्या ट्रेनच्या खाली जाण्यापासून बचावला जातो. त्यानंतर त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मच्या मधोमध बसवले जाते. ही संपू्र्ण घटना रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे. पंरतू तो एक्सवरील@GujaratPolice पेजवरील '' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. ३ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ साधारण ११ वाजून २० मिनिटांनी पोस्ट व्हायरल होताच व्हिडिओला तब्बल १५ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.

एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तो गुजरात पोलिसांच्या पेजवर पोस्ट झालेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''पोलिसांना वेळेचे सूचक दाखवून वापी रेल्वे स्थानकाने धावत्या ट्रेनमध्ये चढताना पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले आणि कौतुकास्पद कामगिरी केली!'' असे लिहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' साहेब मस्तच काम केलं'' तर अनेक यूजर्संनी पोलिसांचे कौतुक केले आहे तर त्या प्रवाशाच्या निष्काळजीपणाचा संताप व्यक्त केलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Shocking Video : खळबळजनक! दरोडेखोरांनी अवघ्या २ मिनिटातच लुटले ४० लाखांचे दागिने; लुटमारीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com