Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Shooting at Sydneys Bondi BeachSaam Tv

Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Shooting at Sydneys Bondi Beach: सिडनीमधील एका बीचवर गोळीबाराची घटना घडली. हनुक्का पार्टीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
Published on

Summary -

  • सिडनीच्या बोंडी बीचवर अंदाधुंद गोळीबार

  • गोळीबारात १० जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी आहे

  • हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार झाला

  • न्यू साउथ वेल्स पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला

  • घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऑस्ट्रेलियातील सिडनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणच्या प्रसिद्ध बोंडी बीचवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. रविवारी सकाळी ही मोठी घटना घडली असून यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोडी बीचवर हनुक्का उत्सव सुरू असताना हा गोळीबाराचा थरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत पोलिसांनी नागरिकांना बीचच्या परिसरात जाणं टाळण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन केले आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक अलर्ट जारी केला आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. कृपया त्या परिसरापासून दूर रहा आणि आपत्कालीन सेवांच्या सूचनांचे पालन करा.'

Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Crime : लाथाबुक्क्यांनी मारलं, चाकूने वार केला, अहिल्यानगरमध्ये पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेदरम्यान सुमारे ५० गोळीबाराचे आवाज ऐकू आले ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. बीचवर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण सैरावैरा पळू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. बीचजवळ आयोजित हनुक्का या ज्यू सणाच्या पार्टीदरम्यान हा गोळीबार झाला.

Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Pune Crime: कोथरूड गोळीबार प्रकरण; पुण्यातील गुंड निलेश घायवळ फरार घोषित

या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत आहे आणि तपास करत आहेत आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गोळीबाराची घटना घडली तेव्हा १००० हून अधिक जण तिथे उपस्थित होते. या गोळीबाराचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गोळीबाराचा आवाज येताना आणि सर्व नागरिक जीव वाचवण्यासाठी पळताचा दिसत आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर सायरन वाजवण्यात आला.

Shocking: बीचवर गोळीबाराचा थरार, किंकाळ्या अन् जीव वाचवण्यासाठी पळापळ; १० जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
Badlapur Crime: सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्येची उकल; डोके चक्रावून टाकणारं बदलापुरातील निरजा आंबेरकर हत्याकांड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com