Badlapur Crime: सर्पदंश, ब्रेन हॅमरेज, नंतर हत्येची उकल; डोके चक्रावून टाकणारं बदलापुरातील निरजा आंबेरकर हत्याकांड

Badlapur Crime News: तीन वर्षांनंतर एका महिलेच्या मृत्यू मागचं गूढ उकललं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह चौघांना अटक केली आहे. या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Badlapur Crime News
Badlapur Police revealing details of the shocking snakebite murder case after three years.saamtv
Published On
Summary
  • बदलापूरमधील महिलेच्या मृत्यूचं तीन वर्षांनंतर गूढ उकललं.

  • सर्पदंश आणि ब्रेन हॅमरेजचा खोटा बनाव करून हत्या करण्यात आली.

  • महिलेच्या पतीसह चार आरोपींना अटक

पत्नीला सर्पदंश देऊन तिची हत्या करणाऱ्या नराधम पतीसह तिघांना बदलापूर पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वीच्या या मृत्यू प्रकरणात पतीने ब्रेन हॅमरेजमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र तिच्याच पतीने सर्पदंश देऊन तिची हत्या केल्याचं उघड झालंय. बदलापूर पोलिसांनी या गुन्ह्याची शिताफीनं उकल करत तिघांना अटक केलीय.

Badlapur Crime News
Shocking : बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा अन्..., मुंबईतील धक्कादायक घटना

असं घडवलं हत्याकांड

बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत १० जुलै २०२२ रोजी निरजा आंबेरकर या महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा पती रूपेश आंबेरकर याने ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यामुळे याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र तीन वर्षानंतर हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय.

Badlapur Crime News
धक्कादायक! सोशल मीडियामुळे ओळख झाली, मैत्रीचं प्रेमात रुपांतर; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर ४ मुलांच्या आईने आयुष्य संपवलं

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांनी एका गुन्ह्यात ऋषिकेश चाळके या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडे इतर गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्यानं सर्पदंशांने केलेल्या हत्येची माहिती दिली. निरजा यांचा पती रूपेश आंबेरकर यानं पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने आपला मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि ऋषीकेश चाळके यांना घरी बोलावलं होतं.

निरजा यांच्या पायाचा मसाज करण्याच्या बहाण्याने चेतन दुधाणे यांनं बरणीतून विषारी साप काढला आणि तो ऋषीकेशच्या हातात दिला. त्यानंतर त्यांनी निरजाच्या पायावर तीनवेळा सर्पदंश करून तिला संपवलं. तसेच ब्रेन हॅमरेजचा बनाव करून नैसर्गिक मृत्यू आल्याचं भासवलं. मात्र ऋषिकेश चाळकेनं दिलेल्या जबाबानंतर या सर्वांनी केलेलं काळं कृत्य जगासमोर आलंय.

पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवून निरजा आंबेरकरचा पती रूपेश आंबेरकर, कुणाल चौधरी आणि चेतन दुधाणे यांना अटक केलीय. आता रूपेशनं निरजाची हत्या का केली? आरोपींचा याआधीही कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा आता पोलिस तपास करतायेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com