धक्कादायक! सोशल मीडियामुळे ओळख झाली, मैत्रीचं प्रेमात रुपांतर; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर ४ मुलांच्या आईने आयुष्य संपवलं

bihar Shocking : बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर ४ मुलांच्या आईने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
bihar news
woman ends life Saam tv
Published On
Summary

बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर महिलेने आयुष्य संपवलं

महिलेच्या आत्महत्येने गावात खळबळ

पतीची बॉयफ्रेंडविरोधात तक्रार

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील ४ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भागलपूरच्या धौरेया पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेने टोकाचं पाऊल उचललं. महिलेच्या आत्महत्येने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

भागलपूरच्या महिलेची ३ वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून झारखंडमध्ये राहणार्‍या राजकुमार साह याच्याशी मैत्री झाली होती. त्यांचं सोशल मीडियावरील मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. महिला राजकुमारच्या प्रेमात इतकी बुडाली की, त्याच्यासाठी नवरा आणि मुलांनाही सोडायला तयार झाली होती.

प्रेमात बुडालेल्या याच ४ मुलांच्या आईचं बॉयफ्रेंडशी कडाक्याचं भांडण झालं. तिला बॉयफ्रेंडसोबत राहायचं होतं. मात्र, बॉयफ्रेंड तिला घेऊन जायला तयार नव्हता. त्यामुळे तिने बॉयफ्रेंडला पोलीस तक्रारीची धमकी दिली. महिलेच्या धमकीवर बॉयफ्रेंड म्हणाला, 'मी तुरुंगात जायला तयार आहे. परंतु तुझ्यासोबत राहायला तयार नाही'. बॉयफ्रेंडचा नकार महिलेच्या जिव्हारी लागला. तिने रागाच्या भरात विष प्यायलं. बायकोने विष प्यायल्याचे कळताच तिला रुग्णालयात दाखल केले.

bihar news
विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रजनी देवी असे मृत महिलेचे नाव आहे. तर सत्यनारायण असे पतीचे नाव आहे. सत्यनारायण यांनी सांगितलं की, आमचं लग्न हे २००७ साली झालं. आमचा सुरुवातीच्या काही वर्षांत सुखाने संसार सुरू होता. आम्हाला ३ मुली आणि १ मुलगा आहे. २०१२ सालानंतर मी नोकरीनिमित्त घर सोडलं. तेव्हापासून माझं बायकोशी भांडण व्हायला सुरुवात झाली'.

bihar news
उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

अन् ४ मुलांची आईने आयुष्य संपवलं

४ मुलांच्या आई सोशल मीडियाच्या माध्यमातून झारखंडमधील तरुणाशी ओळख झाली. आमचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या नात्याविषयी मला काहीच माहिती नव्हतं. माझ्या ओळखीच्या लोकांनी त्यांना सोबत पाहिलं. त्यानंतर मला या प्रकरणाची माहिती झाली. या प्रकरणानंतर मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिने माझं ऐकलं नाही. तिने विष पिऊन आयुष्य संपवलं. मी तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी तिला वाचवू शकला नाही. असे महिलेच्या पतीने बायकोच्या बॉयफ्रेंडच्या विरोधात तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com