विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

maharashtra assembly winter session 2025 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेनात दलालांचा सुळसुळाट असल्याची चर्चा रंगलीय.. या दलालांना चाप लावण्यासाठी सरकारने रणनीती आखलीय.... मात्र या दलालांना चाप लावण्यासाठी सरकारने नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत...पाहूयात...
maharashtra assembly nagpur
maharashtra assembly Saam tv
Published On

मंत्रालय आणि अधिवेशनाच्या काळात विधानभवन परिसरात लोकप्रतिनिधी, कर्मचारी, जनता आणि पत्रकारांसोबतच राबता असतो तो शासकीय कामाची सेटिंग करणाऱ्या दलालांचा. गेल्या अनेक अधिवेशनात याच दलालांनी विधीमंडळाच्या परिसरात उच्छाद मांडला होता. खासगी कामं घेऊन विधान भवनाच्या आवारत आलेल्या दलालांना आता सरकार चाप लावणार आहे. तसं परिपत्रकच विधीमंडळ सचिवालयाने काढलंय. या परिपत्रकात नेमकं काय म्हटलं पाहूया.....

maharashtra assembly nagpur
Maharashtra Politics : राज्याचा राजकारणात भूकंप; अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, VIDEO

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा असणार आहे

विधानभवनात खासगी कामांसाठी पास देणं बंद

अधिवेशन कालावधी आणि दैनंदिन पासही बंद

अध्यक्षांच्या लेखी परवानगीनंच मिळणार प्रवेश

या पत्रकामुळे खासगी कामं करून घेणाऱ्यांना चाप बसणार

विधीमंडळातील वाढत्या गर्दीवरही नियंत्रण येणारनन

maharashtra assembly nagpur
16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी; कोणत्या सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय?

मुंबईतील पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या परिसरात झालेले राडे हे विधीमंडळाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे असेच होते. तसंच फरार गुंड निलेश घायवळचे मंत्रालय आणि विधीमंडळातील वावराच्या व्हिडीओवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं.

maharashtra assembly nagpur
16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी; कोणत्या सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय?

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी मंत्र्यांच्या वादग्रस्त पीएच्या नियुक्या रोखून मंत्रालातल्या दलालीला चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. आता सरकारनं आपला मोर्चा विधीमंडळातल्या दलालांकडे वळवलाय. या परिपत्रकामुळे दलालांचा चाप बसणार का? की यातूनही काहीतरी पळवाट काढणार हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com