National Crime News: धक्कादायक! लॅपटॉप बॅगमध्ये आढळला चिमुरडीचा मृतदेह, 2 दिवसांपासून होती बेपत्ता; अशी घडकीस आली घटना

Noida Crime News: धक्कादायक! लॅपटॉप बॅगमध्ये आढळला चिमुरडीचा मृतदेह, 2 दिवसांपासून होती बेपत्ता
Crime News
Crime News saam tv
Published On: 

National Crime News: ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका गावातून गेलाय दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या मुलीचा मृतदेह शेजारच्या खोलीत हॅन्गरला लटकलेल्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये सापडला आहे.

घरातून दुर्गंधी येत असताना लोकांनी कुलूप तोडले असता रविवारी ही घटना उघडकीस आली. बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा संशय आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची तीन पथके छापेमारी करत आहेत.

Crime News
Sanjay Raut Defamation Case : 'मी ऑफ द रेकॉर्ड काही बोलू का?' मेधा सोमय्या यांची कोर्टात अजब मागणी, न्यायमूर्ती म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील चंदौली जिल्ह्यातील पीडित जोडपे एका गावात दोन वर्षांची मुलगी आणि सात महिन्यांच्या मुलासह राहतात. दोघेही खासगी कंपनीत काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील 7 एप्रिल रोजी ड्युटीवर गेले होते.

दोन्ही मुलांना मागे ठेवून आई काही वस्तू घेण्यासाठी बाजारात गेली होती. दरम्यान, मुलगी संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली. नातेवाइकांनी मुलीचा खूप शोध घेतला, मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. मुलीच्या वडिलांनी रात्री 11 वाजता सूरजपूर पोलीस चौकीला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करून शोध सुरू केला. (Crime News in Marathi)

Crime News
Stock Market Latest Updates: फक्त 5 दिवसात 20 टक्क्यांनी वाढला टाटा समूहाचा 'हा' शेअर, 3 वर्षांत सुमारे दिला 3015% परतावा

नातेवाइकांनीही मुलीचा शोध सुरु केला, मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही. बलियाचे रहिवासी राघवेंद्र हा देखील पीडित कुटुंबियांच्या शेजारच्या खोलीत राहतो. रविवारी सकाळी त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. संशयावरून शेजाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. नातेवाइकांनी आत पाहिले की, एक लॅपटॉप बॅग हॅन्गरला लटकत होती आणि त्यातून दुर्गंधी येत होती. (Latest Marathi News)

बॅगेतून रक्तही वाहत होते. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॅग उघडली तेव्हा सगळेच चक्रावून गेले. एका निष्पाप मुलीचा मृतदेह बॅगेत होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबियांच्या शेजारी राघवेंद्र एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची पत्नी व दोन मुले गावी गेली आहेत. स्थानिकांनी सांगितले की, मृत मुलगी त्याला काका म्हणायची. (Noida Crime News Today)

हा आरोपी कुटुंबीयांसह दोन दिवस मुलीच्या शोधात त्यांना मदत करत होता. मृतदेह त्याच्या खोलीत असल्याचे कोणालाच कळले नाही. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची चर्चा सुरू होताच तो पळून गेला.

Noida Crime News Today : हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही

पोलिसांनी सांगितले की, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ज्याच्या खोलीतून मृतदेह सापडला तो फरार आहे. त्याच्या अटकेनंतर हत्येचे कारण समजू शकेल. बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा संशय लोकांना आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.