Stock Market Latest Updates: फक्त 5 दिवसात 20 टक्क्यांनी वाढला टाटा समूहाचा 'हा' शेअर, 3 वर्षांत सुमारे दिला 3015% परतावा

Tata Group Share Price: फक्त 5 दिवसात 20 टक्क्यांनी वाढला टाटा समूहाचा 'हा' शेअर
Share Market Latest News Updates
Share Market Latest News UpdatesSaam Tv

Tata Teleservices Maharashtra Limited : टाटा टेलिसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड (TTML) या टाटा समूहाच्या कंपनीने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्रचा शेअर 5 टक्क्याच्या अपर सर्किटसह 67.43 रुपयांवर पोहोचला.

गेल्या 5 दिवसात टाटा टेलिसर्व्हिसेसचे शेअर्स 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 210 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 49.80 रुपये आहे.

Share Market Latest News Updates
Monsoon 2023: शेतकऱ्यांची चिंता वाढणार, यावर्षी देशभरात सरासरी 'इतके' टक्केच पाऊस पडणार!

टीटीएमएल शेअर्स 55 रुपयांवरून 67 रुपयांवर पोहोचला

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 31 मार्च 2023 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडचे (TTML) शेअर्स 55.49 रुपयांच्या पातळीवर होते. 10 एप्रिल 2023 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 67.43 रुपयांवर पोहोचले आहेत. (Latest Marathi News)

गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 20% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर 28 मार्च 2023 पासून, टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्रचे (TTML) चे शेअर्स जवळपास 30% ने वाढले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 12395 कोटी रुपये आहे.

Share Market Latest News Updates
Shiv Sena Political Crisis: शिवसेना भवन, शाखा, पक्ष निधी शिंदे गटाला द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

TTML शेअर्सनी 3 वर्षांत दिला 3000% पेक्षा जास्त परतावा

टाटा टेलिसर्वसेज महाराष्ट्र लिमिटेडच्या (Tata Teleservices Maharashtra Limited - TTML) शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत सुमारे 3015% परतावा दिला आहे. 9 एप्रिल 2020 रोजी टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) 2.03 रुपयांवर होते. (Stock Market News)

10 एप्रिल 2023 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्रचे शेअर्स BSE वर 67.43 रुपयांवर झेपावले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांपूर्वी TTML शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर या पैशाची किंमत आता 33.21 लाख रुपये झाली असेल.

डिस्क्लेमर: येथे केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्सबद्दल माहिती दिली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही जाणकारांचा सल्ला घ्यावा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com