Monsoon 2023: शेतकऱ्यांची चिंता वाढणार, यावर्षी देशभरात सरासरी 'इतके' टक्केच पाऊस पडणार!

Monsoon Update: दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चांगला पाऊस पडावा अशी आशा करणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र यावर्षी निराशा होण्याची शक्यता आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023SaamTv

Skymet Monsoon Forecast: अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान होऊन आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चांगला पाऊस पडावा अशी आशा करणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र यावर्षी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण यंदा देशात सरासरीहून कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट (Skymate) या खासगी हवामान शाळेने यावर्षीच्या मान्सूनबाबत प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

Monsoon 2023
Corona Virus News: धास्ती वाढली! 24 तासांत देशामध्ये 5,880 नव्या रुग्णांची नोंद; सक्रीय रुग्णसंख्या 35 हजार पार

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, देशात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहणार आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे चांगला पाऊस झाला होता. पण यावर्षी अल निनोचा प्रभाव वाढल्यामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon 2023
Navi Mumbai Water Cut News: नवी मुंबईत २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन!

देशामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत 858.6 मिमी सरासरी पाऊस राहण्याची शक्यता आहे. स्कायमेटने देशाच्या मध्य आणि उत्तर भारतात कमी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले. मध्य प्रदेश, गुजरात, आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यामध्ये कमी पावसाचा अंदाज आहे. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

Monsoon 2023
Dalai Lama Viral Video: दलाई लामा यांनी लहान मुलाच्या ओठावर चुंबन केल्याने नेटकरी भडकले; व्हिडिओ व्हायरल, काय आहे प्रकरण?

स्कायमेटच्या पावसाच्या अंदाजामुळे देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यात आता पुन्हा एकदा आस्मानी संकट येणार असल्याचे कळताच शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तब्बल 38 हजार हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे द्राक्ष, कांदा, बाजरी, ज्वारी, गहू, फळ भाज्या या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com