धक्कादायक! बँकेला मृत्यूचा पुरावा हवा होता, भाऊ चक्क बहि‍णीचा सांगाडाच घेऊन आला, नेमकं झालं काय?

ओडिशामध्ये बँकेच्या नियमांमुळे एका भावाला मृत बहिणीचा सांगाडा बँकेत आणावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यू प्रमाणपत्र नसल्याने पैसे काढण्यास अडथळे निर्माण झाले होते.
Odisha bank incident
Odisha bank incidentSaam
Published On

बँकेच्या अजब नियमांपुढे माणुसकीचा कसा गळा दाबला जातो, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय. मृत बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एका भावाला चक्क तिचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जायची वेळ आली. बँकेने मृत व्यक्तीचा पुरावा मागितला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या भावाने हा टोकाचा निर्णय घेतला. ओडिशातील ही घटना पाहून एकच खळबळ उडाली असून बँकिंग व्यवस्थेवर आता संताप व्यक्त केला जात आहे.

ओडिशातील केओंझार जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडला. मृत बहिणीच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी भाऊ बँकेत गेला. पण बँकेने खातेदाराला स्वतः हजर राहण्यास सांगितले. ती मृत असल्याचे त्याने सांगितले, पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही ऐकलं नाही. त्यामुळे त्या आदिवासी व्यक्तीने आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत आणला. ही घटना ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोसी शाखेत घडली. दियानाली गावचा रहिवासी असलेला जितू मुंडा (५०) हा व्यक्ती आपल्या मृत बहिणीच्या खात्यातून २०,००० रुपये काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याची बहीण, कालरा मुंडा (५६) हिचा मृत्यू २६ जानेवारी २०२६ रोजी झाला होता.

बँकेत फेऱ्या मारूनही पैसे मिळाले नाहीत

मृत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी जितू याने बँकेत वारंवार चकरा मारल्या. पण पैसे काही मिळाले नाहीत. बँकेकडून एकच प्रश्न विचारला जायचा. त्यामुळे वैतागलेल्या जितूने टोकाचे पाऊल उचलले. बहिणीचा सांगाडाच घेऊन तो बँकेत पोहोचला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या धक्कादायक परिस्थितीची माहिती मिळताच पोलीस बँकेत दाखल झाले. त्यानंतर याला वेगळे वळण मिळाले. जितू याला बँकेच्या नियमांची पुरेशी माहिती नव्हती, त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

Odisha bank incident
डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत गाडला, मुलाला लिहिलेल्या चिठ्ठीने बेरोजगार पतीचे बिंग फुटलं, नेमकं घडलं काय ?
"मी अनेकदा बँकेत गेलो. तिथल्या लोकांनी मला खातेदाराला सोबत आणायला सांगितले. तो मेला आहे असे मी त्यांना सांगितले तरी त्यांनी ऐकले नाही. म्हणून मी पुरावा म्हणून कबर खोदून सांगाडा बाहेर आणला."
जितू मुंडा

जितू आदिवासी आहे. त्याच्या बहिणीच्या खात्यात वीस हजार रुपये होते. ती अविवाहित होती आणि त्याच्यासोबत राहत होती. बहिणीचे निधन झाले, त्यानंतर तो पैसे काढण्यासाठी बँकेत गेला. बँक अधिकाऱ्यांनी त्याला खातेदाराला घेऊन येण्यास सांगितले. जितूने बहिणीचे निधन झाल्याचे सांगितले. बँकेकडून मृत्यू प्रमाणपत्र आणि वारसा हक्काची कागदपत्रे मागितली. जितू आदिवासी असल्याने त्याच्याकडे त्याच्या बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वारसा हक्काची कागदपत्रे नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Odisha bank incident
नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com