नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

Mira Road Attack : मीरा रोडमध्ये सुरक्षारक्षकावर झालेल्या चाकू हल्ल्याला दहशतवादी वळण मिळाले असून आरोपीचे आयसिसशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एटीएसकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Mira Road Attack
Mira Road Attackसाम टीव्ही मराठी
Published On

Mira Road knife attack ISIS link ATS investigation details : मीरा रोड परिसरात सुरक्षा रक्षकांवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे थेट दहशतवादी संघटना ISIS शी संबंध असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर आरोपीने सुरक्षारक्षकावर धर्म विचारून हल्ला केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ जणांची हत्या केली होती, तोच पॅटर्न मीरा रोडमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात आला आहे. "तुला कलमा वाचता येतो का? नमाज पढता येतो का?" असे विचारून आरोपीने सुरक्षारक्षकावर हल्ला केला होता. एवढेच नव्हे तर आरोपीकडे ISIS, जिहाद अशी लिहिलेली नोटसुद्धा आढळली आहे. त्यामुळे मीरा रोड प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मीरा रोडचा हल्ला हा “Lone Wolf Attack” हा दहशतवादी हल्ल्याचा नवीन पॅटर्न असल्याचेही बोलले जात आहे.

एका-दोघांनी अटॅक करायचा आणि त्याचे सोशल मीडियावर लाईव्ह करायचे, त्या प्रकाराला 'Lone Wolf Attack' असे म्हटले जाते. आरोपी जुबेर अंसारी हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार होता. जुबेर अंसारीला आणखी कोणीतरी मदत करत होते, असेही समजते आहे. आरोपी जुबेर अंसारीकडे एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली, त्यावरूनच त्याचे ISIS सोबत कनेक्शन असल्याचे उघड झाले.

Mira Road Attack
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

"ISIS JIHAD GAZA LONE WOLF, LONE WOLVES WILL POUNCE ON YOU" असे चिठ्ठीत लिहिले होते. "YOU MUSHRIKEEN WILL SEE REAL JIHAD IN BILAD (TERRITORY) HIND FROM NOW, AS WELL AS INCOHERENT STATEMENTS LIKE PEOPLE FAMILY WIVES PARENT… WILL LEAVE YOU. MAY ALLAH GUIDE THEM. GAZA WILL ONLY BE FREE BY" असे चिठ्ठीत लिहिलेले आढळले आहे. एटीएसकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Mira Road Attack
डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या पेटीत गाडला, मुलाला लिहिलेल्या चिठ्ठीने बेरोजगार पतीचे बिंग फुटलं, नेमकं घडलं काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com