१००० रुपयांत १० मिनिटांचा न्यूड व्हिडीओ अन्..., आधी ब्लॅकमेलिंग नंतर जबरदस्ती लग्न; तरुणासोबत भयंकर कांड

Andhra Pradesh Crime: आंध्रप्रदेशमधील एका तरुणीची फसवणूक करण्यात आली. या तरुणाला एका तरुणीने ऑनलाईन न्यूड व्हिडीओ दाखवला. त्यानंतर त्याला ब्लॅकमेलिंग करत त्याच्याशी लग्न केले. लग्नानंतर घरातील सोनं आणि पैसे घेऊन ती फरार झाली.
१००० रुपयांत १० मिनिटांचा न्यूड व्हिडीओ अन्..., आधी ब्लॅकमेलिंग नंतर जबरदस्ती लग्न; तरुणासोबत भयंकर कांड
Andhra Pradesh CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • सोशल मीडियावरील ओळख तरुणाली पडली महागात

  • तरुणाला एका तरुणीने ऑनलाईन न्यूड व्हिडीओ दाखवत फसवणूक केली

  • ब्लॅकमेलिंग करत तिने त्याच्याशी लग्न केले

  • लग्नानंतर घरातील पैसे व दागिने घेऊन फरार

सोशल मीडियावर आलेला एक मेसेज कसं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो याचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने एका तरुणाच्या आयुष्याशी असा खेळ केला की ते ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. सोशल मीडियावरची ओळख नंतर १००० रुपयांत तरुणीने तरुणाला न्यूड व्हिडीओ दाखवत फसवले. न्यूड व्हिडीओ दाखवल्यानंतर तिने त्याला ब्लॅकमेलिंग करत लग्न केले. लग्नानंतर ती त्याच्या घरातील पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. तरुण आंध्रप्रदेशचा आणि तरुणी उत्तर प्रदेशची आहे. तरुणीने तरुणासोबत केलेल्या या भयंकर कांडाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव भरत (२७ वर्षे) असून तो मुळचा आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो एका खासगी वाहतूक कंपनीत काम करतो. २०१९ मध्ये एका तरुणीने भरतला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून मेसेज पाठवला होता. तिने त्याला मी पैशांसाठी ऑनलाइन न्यूड व्हिडिओ दाखवण्याचे काम करते असे सांगितले. १००० रुपयांमध्ये मी तुला १० मिनिटांसाठी ऑनलाइन न्यूड होऊन दाखवेल असे तिने त्याला सांगितले. भरत तिच्या फसवणुकीला बळी पडला. तिने चेहरा झाकून भरतला न्यूड व्हिडिओ दाखवला. यानंतर तरुणीने व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊन भरतला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरूवात केली. यासाठी तिने त्याच्याकडून लाखो रुपये उकळण्यास सुरुवात केली.

१००० रुपयांत १० मिनिटांचा न्यूड व्हिडीओ अन्..., आधी ब्लॅकमेलिंग नंतर जबरदस्ती लग्न; तरुणासोबत भयंकर कांड
Shocking: भयंकर! सोशल मीडियावर फक्त १०० रुपयांत विकले जातात कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ

ब्लॅकमेलिंगसोबतच या तरुणीने भरतवर लग्नासाठी दबाव टाकण्यासही सुरुवात केली. २०२१ मध्ये दोघेही लखनऊ आणि गोरखपूरमध्ये भेटले. नंतर २०२३ मध्ये तरुणी हैदराबादला गेली आणि आत्महत्येची धमकी देऊन त्याला लग्न करण्यास भाग पाडले. भीतीमुळे भरतने त्या तरुणीसोबत मार्च २०२५ मध्ये एका मंदिरात लग्न केले आणि नंतर कोर्टात जाऊनही लग्न केले. पण लग्नानंतर तरुणी भरतसोबत नीट वागत नव्हती. ती सतत दुसऱ्या पुरूषाच्या संपर्कात होती आणि त्याला पैसे पाठवत होती. भरतने तो पुरूष कोण आहे याचा तपास केला तर तो तिचा दुसरा नवरा निघाला.

१००० रुपयांत १० मिनिटांचा न्यूड व्हिडीओ अन्..., आधी ब्लॅकमेलिंग नंतर जबरदस्ती लग्न; तरुणासोबत भयंकर कांड
Shocking: ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर

तपासात असेही दिसून आले की, भरतसोबत तरुणीचे तिसरे लग्न होते आणि तिच्या पहिल्या लग्नाशी संबंधित एक खटला आधीच न्यायालयात प्रलंबित होता. एक दिवस तरुणीने भरतला सांगितले की मी देवरियाला जात आहे. त्यावेळी ती भरतच्या घरातील चार लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळून गेली. तेव्हापासून भरत तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे पण तिच्याशी काहीच संपर्क होत नाही. आपला विश्वासघात झाल्याचे भरतच्या लक्षात येताच भरतने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

१००० रुपयांत १० मिनिटांचा न्यूड व्हिडीओ अन्..., आधी ब्लॅकमेलिंग नंतर जबरदस्ती लग्न; तरुणासोबत भयंकर कांड
Shocking: पबबाहेर अंदाधुंद गोळीबार, धडाधड गोळ्या झाडल्या; ३ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

त्यानंतर भरत तरुणी राहत असलेल्या उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात गेला . त्याने पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची तक्रार केली. पण पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला हे प्रकरण आंध्रप्रदेशमधील आहे त्यामुळे याप्रकरणी आंध्रप्रदेशमध्येच तक्रार करण्याचा सल्ला दिला. भरतने आंध्रप्रदेशमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

भरतने असा दावा केला आहे की, तरुणीने यापूर्वी अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क करणे, त्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांच्याशी लग्न करणे आणि नंतर पैसे घेऊन पळून जाणे ही तिची पद्धत आहे. भरतने मागणी केली की आरोपी तरुणीविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जावी आणि कष्टाने कमावलेले पैसे त्याला परत पाहिजे आहेत. भरतने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.

१००० रुपयांत १० मिनिटांचा न्यूड व्हिडीओ अन्..., आधी ब्लॅकमेलिंग नंतर जबरदस्ती लग्न; तरुणासोबत भयंकर कांड
Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com