Shocking: ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर

Gujarat Traffic Police Video: गुजरातमध्ये ट्राफिक पोलिसाने महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन केले.
Shocking: ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर
Gujarat Traffic Police VideoSaam Tv
Published On

Summary -

  • अहमदाबादमध्ये ट्राफिक पोलिसाकडून महिलेला मारहाण

  • भररस्त्यात ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत गैरवर्तन

  • वाहन तपासणीदरम्यान ड्रायव्हिंग लायसन्सवरून वाद

  • घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • गुजरात पोलिसांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन केले

गुजरातमध्ये ट्राफिक पोलिसाने महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली. वाहन तपासणीदरम्यान ट्राफिक पोलिसाने या महिलेला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर संताप व्यक्त करत असून या पोलिसाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरात पोलिस प्रशासनाने या ट्राफिक पोलिसाला निलंबित केलं.

Shocking: ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर
Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये ड्युटीवर असलेल्या ट्राफिक पोलिसाने दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला अडवले. पोलिसाने या महिलेला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यास सांगितले त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान पोलिसाने महिलेला मारहाण केली आणि तिला धमकावले. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती पालडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेली तेव्हा तिला नकार देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर पोलिसांनी फक्त अर्ज घेतला.

वासन येथे राहणाऱ्या बंश्रीबेन मनीष ठक्कर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, १९ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता त्या चार मार्गावरील सिग्नल ओलांडत होत्या. दरम्यान, एका ट्राफिक पोलिस अधिकाऱ्याने तिला थांबवले आणि तिचे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. बंश्रीबेनने त्यांना लायसन्स दिले. बंश्रीबेनने बाजूला उभे राहण्याची विनंती केली तेव्हा वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला राग आला. आयडी खाली पडल्याने पोलिस अधिकाऱ्याने तिला चापट मारल्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्याने तिच्याशी भररस्त्यात गैरवर्तन केले. ११२ कडून तिला मदत मिळाली नाही.

Shocking: ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर
Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

गुजरातचेSummary Pointers (Marathi | किमान 4)

  • अहमदाबादमध्ये ट्राफिक पोलिसाकडून महिलेला मारहाण

  • वाहन तपासणीदरम्यान ड्रायव्हिंग लायसन्सवरून वाद

  • घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • नागरिक आणि नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त

  • गुजरात पोलिसांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले फायरब्रँड काँग्रेस नेते जिग्नेश मेवानी यांनी या घटनेवरून अहमदाबाद पोलिसांवर निशाणा साधला . मेवानी यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, अहमदाबाद पोलिसांना महिलांना अशाप्रकारची वागणूक देताना पाहून माझे रक्त उकळते. एका गुजराती महिलेने एका पोलिस अधिकाऱ्याकडे त्याचे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र तिच्या हातातून निसटून रस्त्यावर पडते आणि तोच तिचा गुन्हा बनतो. मग खाकी वर्दीतील हा गुंड तिला मारतो आणि तिला रक्तबंबाळ करतो. हे काय आहे? पोलिसांचे काम नागरिकांचे रक्षण करणे आहे की त्यांना मारहाण करणे?', असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Shocking: ट्राफिक पोलिसाचे महिलेसोबत भयंकर कृत्य, भररस्त्यात रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, संतापजनक VIDEO समोर
Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com