Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल

Belapur Women Viral Video News : बेलापूर मेट्रो स्टेशनजवळ आढळलेल्या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेटपटू सलीम दुरानी यांची पत्नी असल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल
Belapur Women Viral Video NewsSaam Tv
Published On
Summary
  • बेलापूर मेट्रो स्टेशनजवळील वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • स्वतःला क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा

  • दुबईत विमान कंपनी चालवत असल्याचेही महिलेचे म्हणणे

  • दुराणी कुटुंबाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण नाही

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यासोबतच व्हिडिओमधील व्यक्ती देखील तितकेच व्हायरल होतात. अशाच एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेने स्वतःला एका क्रिकेटरची बायको असल्याचं सांगितलं आहे, तर स्वतः एक विमान कंपनी चालवत असल्याचंही म्हटलं आहे. असा दावा केला जातो आहे की व्हायरल झालेला हा व्हिडिओ बेलापूर मेट्रो स्टेशनच्या नजीकचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ मधील वृद्ध महिलेचं नाव रेखा श्रीवास्तव आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, त्या दुबईमध्ये ऐशोआरामचं जीवन जगत होत्या आणि एक विमान कंपनी चालवत होत्या. त्या एका दिवंगत क्रिकेटपटू सलीम दुरानी यांची पत्नी असल्याचा दावा करत आहे. बेलापूर मेट्रो स्टेशनवर नाजूक अवस्थेत आढळलेल्या या महिलेने दुरानींबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या.

Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

व्हिडिओमध्ये महिलेने आरोप केला आहे की तिच्या आयुष्यात एक दुःखद वळण आले, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. रेखा यांनी असेही सांगितले की, २०२३ मध्ये निधन झालेले सलीम दुराणी देशभर क्रिकेट खेळायचे. यादरम्यान त्यांनी प्रमुख व्यक्तींना भेटल्याचा उल्लेख केला. त्यांनी असाही दावा केला की त्यांचा स्वतःचा बंगला होता, पण त्यांना सर्व काही विकावे लागले. या वृद्ध महिलेने म्हटल्याप्रमाणे अद्यापही सलीम दुरानी यांच्या कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही.

सलीम दुरानी कोण होते?

सलीम दुरानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानातील काबूल येथे झाला. नंतर ते जामनगरला गेले. भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी ते ही एक खेळाडू होते. दुरानी काही षटकांमध्ये खेळाचे नशीब बदलू शकत होते. दुरानी यांनी १९६१ - ६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताला विजय मिळवून दिला, कोलकाता आणि चेन्नई येथील सामन्यांमध्ये आठ आणि नंतर दहा विकेट्स घेतल्या. दुरानी यांनी क्लाइव्ह लॉईड आणि गॅरी सोबर्स यांना शून्यावर बाद करून त्यांचा पराभव केला. दुरानी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव कसोटी शतक यशस्वीरीत्या पार पाडले.

Viral Video : हायफाय राहणं, फाडफाड इंग्लिश, क्रिकेटरची बायको, एकेकाळी स्वतःची विमान कंपनी; भीक मागण्याची वेळ, VIDEO व्हायरल
WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

अर्जुन पुरस्कार मिळवणारे दुरानी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांनी २९ कसोटी सामन्यांमध्ये १,२०२ धावा केल्या आणि ७५ विकेट्स घेतल्या. त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी जामनगर येथे निधन झाले. व्हायरल झालेल्या महिलेच्या व्हिडिओमुळे सलीम दुरानीच्या वैयक्तिक आयुष्याभोवती बरीच चर्चा रंगली असली तरी, त्यांच्या कुटुंबाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com