WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!

Wifi Router Internet Speed News : वाय-फाय स्लो असण्यामागे इंटरनेट कंपनी नाही तर तुमच्या घरातील राउटरची चुकीची जागा कारणीभूत असू शकते. काच, धातू, मायक्रोवेव्ह आणि ब्लूटूथ उपकरणांपासून राउटर दूर ठेवल्यास नेटचा वेग वाढू शकतो.
WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!
Wifi Router Internet SpeedSaam Tv
Published On

मानवी जीवनात जगण्यासाठी पाणी आणि अन्न लागतं, तसचं प्रगतशील तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अँड्रॉईड मोबाईल फोनना वायफायची अत्यंत गरज भासते. आजकाल, प्रत्येक घरात वाय-फाय राउटर आहे, परंतु असे असूनही, इंटरनेट स्पीडबद्दल तक्रारी कायम आहेत. व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये व्यत्यय, वेबपेज उघडण्यास विलंब आणि वारंवार नेटवर्क डिस्कनेक्शन ही सामान्य समस्या बनली आहे. बर्‍याच वेळा, लोक याचे खापर कंपनीवर फोडतात, मात्र खरं तर घराच्या आत राउटरचे चुकीचे स्थान आणि त्याच्या जवळ ठेवलेल्या वस्तू देखील या देखील स्लो नेटवर्कला जबाबदार असतात.

काच आणि धातू नेटवर्कचे मोठे शत्रू

वाय-फाय रेडिओ लहरींवर काम करते. जर राउटरजवळ मोठे आरसे असतील तर सिग्नल ट्रान्सफर होऊ शकतो आणि दिशा बदलू शकतो. त्यामुळॆ कव्हरेज कमी होते. त्याचप्रमाणे, धातू सारख्या वस्तू देखील रेडिओ लहरींना ब्लॉक करते, ज्यामुळे नेटवर्क कमकुवत होते. म्हणून, राउटर कधीही काचेच्या किंवा धातूच्या वस्तूंजवळ ठेवू नये.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

ब्लूटूथ उपकरणांमुळे अडथळा

स्पीकर्स, माईक आणि कीबोर्ड सारख्या ब्लूटूथ डिव्हाइसेसचा देखील वाय-फायवर परिणाम होतो. खरं तर, ब्लूटूथ आणि वाय-फाय दोन्ही 2.4 GHz फ्रिक्वेन्सीवर चालतात. अशा परिस्थितीत, व्यत्यय वाढतो आणि इंटरनेटचा वेग कमी होतो. अशापरीस्थितीत ब्लूटूथ गॅझेट्स राउटरपासून काही अंतरावर ठेवणे चांगले.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!
Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

फर्निचर किंवा कपाटात राउटर ठेवणे टाळा

जर राउटर लाकडी रॅक किंवा कपाटात ठेवला असेल तर सिग्नल योग्यरित्या बाहेर पडत नाही. यामुळे कव्हरेज कमकुवत होते आणि कनेक्टिव्हिटी वारंवार तुटू शकते. राउटर नेहमी मोकळ्या आणि उंच ठिकाणी बसवावा जेणेकरून सिग्नल सर्व दिशेने समान प्रमाणात पसरेल.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!
Dadar Station : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका! 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर उभारणार एलिव्हेटेड डेक; जाणून घ्या

स्वयंपाकघर आणि मायक्रोवेव्हपासून अंतर ठेवा

स्वयंपाकघरात ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे वाय-फायला धोका निर्माण होतो. विशेषतः मायक्रोवेव्ह, जे २.४ GHz वर चालते आणि रेडिएशन लीक करते. जर राउटर त्याच्या जवळ ठेवला तर इंटरनेटची गुणवत्ता खराब होऊ शकते. म्हणून, राउटर स्वयंपाकघरापासून दूर आणि घराच्या मध्यभागी ठेवणे नेहमीच चांगले.

WiFi Internet Tips : फक्त १ काम करा, घरातलं वायफाय धावेल बुलेटच्या स्पीडनं!
Shocking : बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा अन्..., मुंबईतील धक्कादायक घटना

जलद वाय-फाय स्पीड मिळविण्यासाठी, फक्त एक चांगला प्लॅन घेणे पुरेसे नाही. तर राउटर कुठे आणि कसा ठेवायचा हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर त्याच्याभोवती काच, धातू, ब्लूटूथ डिव्हाइस, कपाट किंवा मायक्रोवेव्ह सारख्या गोष्टी नसतील तर तुमच्या नेटचा वेग खरोखरच रॉकेटसारखा राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com