Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Akola Leopard News : अकोल्यातील कसूरा गावाजवळ बिबट्यासह चार पिल्लांचा मुक्त संचार आढळून आला. एक पिल्लू वनविभागाच्या ताब्यात असून उर्वरित बिबट्या व पिल्लांचा शोध सुरू आहे.
Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...
Akola Leopard NewsSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यातील कसूरा गावात बिबट्यासह चार पिल्ले आढळली

  • एक बिबट्याचे पिल्लू ग्रामस्थांच्या हाती लागले

  • पिल्लू सध्या अकोला वन विभागाच्या ताब्यात

  • परिसरात भीतीचे वातावरण; शोध मोहीम सुरू

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यातील कसूरा गावात बिबट्याचा आणि त्याच्या पिल्लांचा मुक्त संचार सुरु असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कसूरा जवळील संत गजानन महाराज मंदिराजवळ बिबट्यासह ४ पिल्ले आढळून आली. या ४ पिल्लांपैकी १ पिल्लू रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या कसूरा गावात बिबट्या आणि त्याची ४ पिल्ले फिरत असताना शेतकऱ्यांना दिसली. या दरम्यान बिबट्या आणि ३ पिल्ले पुढे निघून जाण्यात यशस्वी झाले. मात्र ४ पैकी बिबट्याचे १ पिल्लू ग्रामस्थांनी पकडले. या संदर्भात माजी सरपंच विठ्ठल दही यांनीअकोला वन विभाग व उरळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी तसेच उरळ पोलिस स्टेशनचे अधिकारी कसूर्यात दाखल झाले.

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...
Dadar Station : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका! 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर उभारणार एलिव्हेटेड डेक; जाणून घ्या

ज्या ठिकाणी बिबट्याचे पिल्ले दिसून आली तो मार्ग अकोला ते शेगाव दिंडी मार्ग आहे. या रस्त्यावर कायम मोठी वर्दळ असते. हे बिबटचे पिल्लू सध्या अकोला वन विभागाच्या ताब्यात आहे. या बिबट्याच्या पिल्लाची शारीरिक तपासणी केल्यानंतर जंगलात सोडून देण्याच्या परिस्थितीत असल्यास त्याला सुखरूप पणे सोडून देण्यात येईल अशी माहिती अकोला वन विभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांनी दिली.

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार काल रात्री घडला आहे. मात्र कसूरा लगत असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिराजवळ बिबट आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली असून बिबट्या आणि त्याच्या उर्वरित ३ पिल्लांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com