इंदूरमधून धक्कादायक प्रकरण समोर.
२१ वर्षीय तरूणीला ब्लॅकमेल करून फसवलं.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल.
इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. हॅपी पंजाबी उर्फ इरफान अली विरूद्ध एका २१ वर्षीय महिलेनं बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीनं गर्भपात केल्याप्रकरणी केस दाखल केली आहे. युवतीचा आरोप आहे की, आरोपीनं त्याची खरी ओळख लपवली. तिला नोकरीचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. नंतर तिचे खासगी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केलं.
त्यानंतरही आरोपी पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवत राहिला, असा आरोप महिलेनं केला. तो तिच्यावर धार्मिक दबावही टाकत होता. कलमा न म्हटल्याबद्दल तो तिला मारहाणही करत असल्याचा आरोप महिलेनं केला. पीडितेनं या प्रकरणात करनी सेनेची मदत घेतली. तसेच पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे विजयनगर पोलिसांनी आरोपीविरोधात अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला पोलिसांनी अटकही केली आहे.
तक्रारीनुसार, पीडित तरूणी ही मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे. ती निपानिया येथे भाड्याच्या घरात राहत होती. ती मेकअप आर्टिस्ट आहे. मे २०२३ साली तरूणीची इरफान अलीसोबत भेट झाली. त्यावेळी पीडितेला त्यानं हॅपी पंजाबी नाव असल्याचं सांगितलं. हॅपीनं काम देण्याच्या बहाण्याने बोलावलं. तसेच कोल्ड्रिंगमध्ये ड्रग्ज मिसळून दिलं. यामुळे तरूणी बेशुद्ध पडली.
सकाळी उठल्यावर तरूणीला अंगावर कपडे दिसले नाही. हॅपीनं जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप महिलेनं केला. तसेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ब्लॅकमेल करून त्यानं वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचं तिनं सांगितलं. २०२४ साली हॅपी हा पंजाबी नसून इरफान अली असल्याचं समजलं. तेव्हा मुस्लिम असल्याचं कळलं. त्यानं कलमा वाचण्यास जबरदस्ती केली, असाही आरोप पीडितेनं केला.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं कुटुंबाला याबाबत माहिती दिली. सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे पीडितेनं आरोपीविरोधात तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, नंतर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, हॅपी इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पार्टीचं आयोजन करतो. त्याच्या नावे १५ हून अधिक गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.