मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट; आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, संतोष देशमुखांच्या भावाचं कनेक्शन काय?

Third Video Emerges in Manoj Jarange Plot Case: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणातील आरोपी दादा गरूड याचा आणखी एक व्हिडिओ समोर. धनंजय देशमुखांना २० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा व्हिडिओत खळबळजनक दावा.

Shocking Twist in Manoj Jarange Case 20 Crore Offer to dhananjay deshmukh
Shocking Twist in Manoj Jarange Case 20 Crore Offer to dhananjay deshmukhSaam
Published On
Summary
  • दादा गरूडचा आणखी एक व्हिडिओ समोर

  • धनंजय देशमुख यांना २० कोटी रूपयांची ऑफर

  • व्हिडिओतून खळबळजनक दावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दादा गरूडला हा पोलिसांच्या ताब्यात आहे.. अशातच त्याचे अनेक कारनामे उघडकीस येत आहे. आरोपी दादा गरूड याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वी दादा गरूडचे तीन व्हिडिओ समोर आले होते. मात्र, आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्याला हादरवणारा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना ऑफर देण्यात आल्याचं दिसून येत आहे. धनंजय देशमुख यांना वीस कोटी रुपयांची ऑफर (धनंजय मुंडे,सुशिल कराड) यांनी शासकीय बॉडीगार्ड संतोष जाधव याच्यासमोर दिलं असल्याचा आरोप होत आहे.


Shocking Twist in Manoj Jarange Case 20 Crore Offer to dhananjay deshmukh
'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना गुंतवून टाकू, असे म्हणत धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी बोलावलं होतं. मात्र, धनंजय देशमुख यांनी जाण्यास नकार दिला. 'माझ्या तत्वात बसत नाही', असं म्हणत त्यांनी जाणं टाळलं, असा दावा करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांची २० कोटी रूपयांत सुपारी, गंगाधर काळकुटे यांना लोकसभेला २५ कोटींची ऑफर, आणि आता धनंजय देशमुख यांना २० कोटी रुपयांची ऑफर. या सर्व दाव्यांमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


Shocking Twist in Manoj Jarange Case 20 Crore Offer to dhananjay deshmukh
४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मार्च-एप्रिल महिन्यात मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसद्वारे, 'तथ्य समोर मांडण्यासाठी उपस्थित राहुन गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करावे,' असे सांगत १० नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्यासह एकूण सहा जणांना ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी या चौकशीला सामोरे जातात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com