४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

School Bus Crashes 200 Feet Down in Akkalkuwa’s Amli Bari Ghat: नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी घाटात भीषण अपघात घडला. गाडीवरील ताबा सुटल्यानं स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली.
School Bus Crashes 200 Feet Down in Akkalkuwa’s Amli Bari Ghat
School Bus Crashes 200 Feet Down in Akkalkuwa’s Amli Bari GhatSaam
Published On
Summary
  • अमली बारी घाटात भीषण अपघात.

  • स्कूल बस २०० फूट खोल दरीत कोसळली.

  • ४०-४५ विद्यार्थी जखमी.

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात घडला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू तर, अनेक विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळेतील होते. शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अपघात घडला. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी मेहुणबारे येथील शाळेची बस मोलगीहून अक्कलकुवाच्या दिशेने जात असतानाच अपघात घडला.

School Bus Crashes 200 Feet Down in Akkalkuwa’s Amli Bari Ghat
कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

स्कूलबस मध्ये अंदाजे 40 ते 45 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. अमली बारी घाटातील तीव्र वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने बस थेट 200 फूट खोलदरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रूग्णालयात नेलं.

School Bus Crashes 200 Feet Down in Akkalkuwa’s Amli Bari Ghat
शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. हा भीषण अपघात नेमका घडला कसा? बस २०० फूट दरीत कोसळली कशी? याचा तपास सुरू आहे. हा अपघात नेमकं कोणत्या चुकीमुळे झाली? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com