

टेलिग्रामवर प्रायव्हेट कपल व्हिडीओंची बेकायदेशीर विक्री
अवघ्या १०० रुपयांत विकले जातात प्रायव्हेट व्हिडीओ
पेमेंटसाठी QR कोड वापरून लिंक दिली जाते
अनेक राज्यांमध्ये या रॅकेटचे जाळे पसरलेले
सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲपचा वापर जसा वाढत चालला आहे तश्या गुन्हेगारीच्या घटना देखील वाढत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ विकले जातात. फक्त १०० रुपयांमध्ये हे व्हिडीओ विकले जात आहेत. यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फक्त एकाच राज्यापूरते हे प्रकरण महत्वाचे राहिले नाही तर अनेक राज्यात याचे नेटवर्क पसरले आहे.
अलिकडेच एका कपलचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. याचा तपास केल्यानंतर असे दिसून आले की हे फक्त एक उदाहरण आहे. टेलिग्रामवर असे शेकडो ग्रुप सक्रिय आहेत जिथे प्रायव्हेट व्हिडिओंच्या लिंक्स पैशासाठी शेअर केल्या जात आहेत. हा संपूर्ण व्यवसाय चोरीच्या आणि बेकायदेशीरपणे लीक झालेल्या मोबाइल व्हिडिओंवर आधारित आहे.
एका तपासात असे दिसून आले की, हे गट दलाल चालवतात जे पेमेंट मिळाल्यावर ग्राहकांच्या विनंतीनुसार लिंक्स पाठवतात. वेगवेगळ्या राज्यांतील कपल्सचे व्हिडिओ अस्तित्वात असल्याचा दावा केला जातो. पेमेंटसाठी क्यूआर कोड पाठवले जातात आणि मिळाल्यावर व्हिडिओची लिंक दिली जाते. व्हिडिओची किंमत वय आणि स्थानावर अवलंबून असते. काही व्हिडिओ फक्त १०० रुपयांना उपलब्ध असतात. तर विशिष्ट राज्यातील व्हिडिओंची किंमत २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असते. या बेकायदेशीर बाजारात छत्तीसगडच्या कपल्सच्या व्हिडिओंना जास्त मागणी असते.
सायबर तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, काही जण त्यांच्या मोबाइलवरील वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेबाबत अनेकदा निष्काळजी होतात. एका छोट्याशा चुकीमुळे वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ चुकीच्या हातात जाऊ शकतात. ज्याचा वापर ब्लॅकमेलिंग आणि बेकायदेशीर विक्रीसाठी केला जाऊ शकतो. सर्वांना सतर्क राहण्याचे, वैयक्तिक सामग्री शेअर करण्यापासून दूर राहण्याचे आणि संशयास्पद अॅप्स आणि लिंक्स टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.