NCP Crisis: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली! पुढील सुनावणी कधी? तारीख समोर!

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी कोणाची? दोन्ही पवारांकडे किती आमदार? निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं, जाणून घ्या
Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit PawarSaam Tv
Published On

Sharad Pawar Vs Ajit Pawar:

राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीला स्वतःच शरद पवार उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून कोणतेही नेते या सुनावणीला हजर नव्हते.

यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. तर अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली. दोन्ही गटाकडून खरा पक्ष आपलाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ९ तारखेला दुपारी चार वाजता पार पडणार आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Maharashtra Politics: 'जयंत पाटील सोबत आले तर त्यांचं स्वागत', निवडणूक आयोगातील सुनावणी आधी प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य

अजित पावर गटाने काय मांडला युक्तिवाद?

या सुनावणीत आधी अजित पवार गटाच्या वकिलांनी बाजू मांडली. अजित पवार गटाकडून १ लाख ६२ हजार प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल करण्यात आले. तसेच आमच्याकडवं ५३ पैकी ४३ आमदार आहेत. तसेच विधानपरिषद ९ पैकी ६ आमदार, नागालँडचे ७ आमदार असल्याचं अजित पवार गटाने आपली बाजू मांडताना सांगितलं आहे. (Latest Marathi News)

अजित पवार गटाच्या बाजूने नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद करताना दावा केला आहे की, २८ राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्यासोबत आहे. त्यांनी याशी संबंधित प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहेत.

Sharad Pawar Vs Ajit Pawar
Eknath Shinde: एक फूल एक हाफने आम्हला शिकवायची गरज नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर CM शिंदेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे.

शरद पावर गटाने काय मांडला युक्तिवाद?

निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत. एक गट बाहेर पडला आहे. मात्र मूळ पक्ष आमच्यकडेच असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेटही घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com