Maharashtra Politics: 'जयंत पाटील सोबत आले तर त्यांचं स्वागत', निवडणूक आयोगातील सुनावणी आधी प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य

NCP vs NCP Crisis: 'जयंत पाटील सोबत आले तर त्यांचं स्वागत', निवडणूक आयोगातील सुनावणी आधी प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
Praful Patel On Jayant Patil
Praful Patel On Jayant Patil Saam Tv
Published On

Praful Patel On Jayant Patil :

राष्ट्रवादी पक्ष चिन्ह संदर्भात आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. याआधी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''जयंत पाटील आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत आहे.'' त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुटल चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी पक्ष चिन्ह संदर्भात होणाऱ्या सुनावणीवर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''निवडणूक आयोगात हे प्रकरण आहे. आम्हाला खात्री आहे की संघटन आणि लेजिस्लेटिव्ह लोक आमच्यासोबत आहे. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढली आहे. ज्या 2 राज्यात मान्यता आहे ती दोन्ही राज्य आमच्या सोबत आहेत.

Praful Patel On Jayant Patil
Maharashtra Politics: महायुतीत अजित पवारांची एन्ट्री होताच लोकसभा जागा वाटपाचं गणित बिघडलं? शिंदे गटाला कोणता फॉर्म्युला हवाय?

ते म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगात लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. तिथे कोण गेले ते महत्वाचं नाही तर तथ्य, कायदा काय आहे हे महत्वाचं आहे. आम्हाला खात्री आहे की, कागदपत्रच्या आधारे आम्हाला निवडणूक आयोग पक्ष म्हणून मान्यता देणार. (Latest Marathi News)

पटेल म्हणाले की, आम्ही सगळ्या आमदारांचे प्रतिज्ञापत्र 30 जूनला सादर केले आहेत. बहुतांश आमदार यांच्या प्रतिज्ञापत्र पिटीशनसह दाखल केले आहेत. त्यांच्याकडचे आमदार किती आमच्या संपर्कात आहेत, ते आता सांगत नाही. ते म्हणाले, जयंत पाटील कुठं जातील हे मला माहित नाही, मात्र आमच्याकड आलेतर त्यांचं स्वागत आहे.

Praful Patel On Jayant Patil
Eknath Shinde: एक फूल एक हाफने आम्हला शिकवायची गरज नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर CM शिंदेंचा हल्लाबोल

प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला आहे की, ''५३ पैकी ४३ विधानसभा आमदार आणि विधानपरिषद ९ पैकी ६ आमदार आपल्या बाजूने आहे.'' दरम्यान, आज चार वाजता राष्ट्रवादी पक्ष चिन्ह संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होणार आहे. या सुनावणीला स्वतः शरद पवार उपथित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com