Eknath Shinde: एक फूल एक हाफने आम्हला शिकवायची गरज नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर CM शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Uddhav Thackeray: मी स्वत: याप्रकरणी चौकशी करतोय. नांदेडची घटना अतिशय दुर्दैवी आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV
Published On

Maharashtra Political News:

उद्धव ठाकरेंच्या एक फूल दोन हाफ या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जे एक फूल एक हाफ आहेत यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde
Breaking News: कोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे सरकारचं एक पाऊल मागे; मविआच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती उठवली

नांदेडमध्ये झालेल्या घटनेत रुग्णांचे नाहक बळी गेले. या घटनेवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की,"एक फूल एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यका नाही. आमचे मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. मी स्वत: याप्रकरणी चौकशी करतोय. नांदेडची घटना अतिशय दुर्दैवी आहे."

"भविष्यात अशी घटना घडूनये यासाठी प्रत्येक जिल्हाधीकाऱ्यांनी आपल्या विभागातील शासकीय दवाखान्यांमध्ये स्वत: उपस्थित राहून पाहाणी केली पाहिजे. अशा सूचना आम्ही त्यांना दिल्या आहेत. मनुष्यबळ वाढवण्याचे अधिकार देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.", असंही शिंदेंनी म्हटलंय.

कोरोना काळात एकीकडे माणसं मरत होते, तर दुसरीकडे हे घरात नोटा मोजण्याचे काम करत होते. त्यांचा खरा चेहरा नागरिकांनी पाहिलाय. एक नगरसेवकही घरात बसून काम करत नाही. मात्र मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरात बसून काम करत होते, अशी खरमरीत टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

रुग्णालयात बळी जात असताना मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री नांदेडला का गेले नाहीत? एक फुल, एक हाफ दिल्लीत आहेत, दुसरा हाफ कुठे आहे? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं होतं.

Eknath Shinde
Raju Shetti News: राजू शेट्टींची मोठी घोषणा! यापुढे 'स्वाभिमानी संघटनेत' राजकीय नेते अन् कार्यकर्त्याला नो एन्ट्री

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com