एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana dead : हरियाणातील सोनीपत एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात काँग्रेस नेते खुशबाज सिंह जट्टाना आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून पोलिस तपास सुरू आहे.
Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana Killed
Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana KilledSaam TV
Published On

Khushbaaz Singh Jattana accident details Sonipat expressway : पंजाब काँग्रेसमधील दिग्गज नेते खुशबाज सिंह जट्टाना यांचा गुरुवारी संध्याकाळी भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कुंडली भागात एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली. ररस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जट्टाना यांच्या एसयूव्ही (SUV) गाडीला एका भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात जट्टाना यांच्यासह त्यांच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, खुशबाज जट्टाना हे कुंडली-गाझियाबाद-पलवल एक्सप्रेसवेवरून जात होते. यावेळी त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून टायर बदलण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी मागून आलेल्या एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत खुशबाज सिंह जट्टाना (४५) आणि त्यांचे चालक परमिंदर सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे.

Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana Killed
पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका, डिझेल ५२० वर तर पेट्रोलची किंमतही अवाक्याबाहेर

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी ट्रक चालकाची ओळख पटवली असून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे. अपघात प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana Killed
पहाटे काळाने घाला घातला! त्याची कार थेट कालव्यात गेली, पत्नी अन् सासू-सासऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू

खुशबाज जट्टाना यांनी काँग्रेसकडून २ वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१७ आणि २०२२ मध्ये पंजाबच्या तलवंडी साबो मतदारसंघातून ते विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. पण त्यांना दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. ते बठिंडा ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण काळाने घाला घातला अन् त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana Killed
राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

खुशबाज जट्टाना यांच्या निधनामुळे पंजाब काँग्रेसमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा यांनी दुख व्यक्त केले. ते म्हणाले की, पक्षाने एक उमदा आणि ऊर्जावान तरुण नेता गमावला आहे. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनीही जट्टाना यांना श्रद्धांजली वाहिली असून हे पक्षाचे मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे.

Senior Congress Leader Khushbaaz Singh Jattana Killed
Dombivli : डोंबिवली हादरले! ३ रिक्षा चालकाने महिलेवर केला सामूहिक बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com