Dombivli : डोंबिवली हादरले! ३ रिक्षा चालकाने महिलेवर केला सामूहिक बलात्कार

Kalyan gang rape case : डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून शहरात संतापाची लाट उसळली आहे.
crime News
crime NewsSaam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी

Kalyan gang rape case auto drivers arrested details : डोंबिवलीमध्ये ३ रिक्षा चालकांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. येथील खंबाळपाडा परिसरात महिलेवर ३ जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कल्याणमध्येच एका खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये कामाला आहे.

महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर डोंबिवलीमध्ये एकाच संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का? असा संतप्त सवाल डोंबिवलीकरांकडून विचारला जात आहे. पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डोंबिवली पोलिसांकडून तात्काळ तपासाची चक्रे फिरवण्यात आली. पोलिसांनी काही तासांच्या आतच आरोपींना बेड्या ठोकल्या.

crime News
ठाकरेंचे २ खासदार अचानक शिंदेंच्या खासदाराच्या घरी, नेमकं कारण काय? राज्यात भूकंप होणार?

महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. टिळक नगर पोलिसांनी रिक्षा चालक चेतन चौहान, हेमंत चौहान, उमेश वर्मा या तिघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून कसून तपास केला जात आहे. महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर आता तिन्ही आरोपींना पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

crime News
खरातने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार, गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या? कोर्टात नेमकं काय काय झालं?

सोलापूरची राहणारी ही महिला डोंबिवलीत एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करते. तिची ओळख असलेल्या रिक्षाचालक मित्रांनी तिला पार्टीसाठी खंबाळपाडा येथील एका फ्लॅटवर नेले. पार्टी झाल्यानंतर या तिघांनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी त्वरित गुन्हा दाखल करून तिन्ही रिक्षाचालकांना अटक केली आहे. चेतन चौहान, हेमंत चौहान आणि उमेश वर्मा अशी या तिघांची नावे असून ते डोंबिवलीत रिक्षा चालवतात. पुढील तपास टिळकनगर पोलीस करीत आहेत.

crime News
Solapur : शिवरायांच्या पुतळ्यावरून सोलापुरात वाद, तहसीलदाराच्या गाडीवर दगडफेक, पोलिसांवरही हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com