काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मन्नान मलिक यांचे मंगळवारी रांची येथील एका रुग्णालयात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. डॉक्टरांनी दिलेल्या महितीनुसार, फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वासनसंबंधी आजार होता आणि अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालिक यांचे पार्थिव झारखंड विधानसभेत आणणण्यात आले, या ठिकाणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो तसेच इतर आमदारांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
सोरेन यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत म्हटले की, मन्नान मलिक यांनी आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनातून झारखंड, विशेषतः धनबादच्या लोकांचा आवाज प्रभावीपणे मांडला. त्यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी लोकप्रतिनिधी गमावला आहे. महतो यांनीही त्यांच्या निधनाला झारखंडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकुर यांनीही शोक व्यक्त करत सांगितले की, मलिक यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवा, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांसाठी समर्पित केले. त्यांच्या साधेपणा आणि प्रामाणिकतेमुळे त्यांनी झारखंडच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती.
मन्नान मलिक दोन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय होते. २००९ मध्ये त्यांनी धनबाद विधानसभा मतदारसंघातून राज सिन्हा यांचा ८९० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर ते पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा धनबादमधून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.