Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

US Iran tensions : होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण, जहाजांवरील प्रस्तावित शुल्क आणि अमेरिका-इराणमधील वाढता तणाव यामुळे जागतिक तेलपुरवठा आणि सागरी व्यापाराबाबत चिंता वाढली आहे.
Donald Trump
Donald Trump NEWSSaam tv
Published On

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

US Iran Strait of Hormuz latest tensions : अमेरीका-इराण तणावामध्ये होर्मुझ कळीचा मुद्दा बनलाय. अमेरिकेनं या जलमार्गातून जाणाऱ्या जहाजांवर २० टक्के टॅक्स लावलाय. त्यामुळे इराण कमालीचं संतापलंय. आता या टोलवरून युद्ध होण्याची शक्यता आहे. पाहूया एक रिपोर्ट.

काही दिवसांच्या युद्धविरामानंतर अमेरीका आणि इराणध्ये पुन्हा संघर्ष सुरु झालाय. होर्मुझचा जलमार्ग हा कळीचा मुद्दा बनलाय. होर्मुझच्या जलमार्गावर अमेरीकचे नियंत्रण असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. इतकच नाही तर होर्मुज ओलांडणाऱ्या जहाजांवर 20% शुल्क लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केलाय.

या निर्णयाला इराणने तीव्र विरोध केलाय. अमेरिका नाही तर इराणच होर्मुजचा खरा रक्षक असल्याचं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची म्हणालेत. ट्रम्प यांचे 20% शुल्क खूप जास्त आहे. इराण जहाजांकडून योग्य शुल्क वसूल करेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय. दुसरीकडे इराणकडून आता ओमानच्या हद्दीतही व्यापारी जहाजांना लक्ष्य केलं जातंय. या मार्गातून जगातील मोठ्या देशांचा तेल पुरवठा होतो. येथील तणावामुळे जागतिक व्यापार विस्कळीत होण्याची आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची मोठी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

Donald Trump
इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबलं, देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

अमेरिकेच्या लष्कराने इराणविरुद्धच्या लढाईत पहिल्यांदाच आपल्या कॉर्सेअर सी ड्रोनचा वापर केला आहे.अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले. या हल्ल्यांमुळे इराणी सैन्याचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरीकेने केलाय. प्रत्युत्तर म्हणून, इराणने बहरीन, कुवेत, कतार आणि जॉर्डनमधील अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या तळांवर हल्ला केला. मात्र अनेक क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आली.

Donald Trump
ट्रम्प झुकले, आखातात शांतता, इराण-अमेरिकेत 'व्हर्साय' करार, य़ुद्धबंदीच्या करारात नेमकं काय?

दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याचे सांगितले. पण त्याचबरोबर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासही सहमती दर्शवली आहे. या चर्चेत कतार मध्यस्थी करत आहे. ट्रम्प यांची मागणी आहे की, इराणने पूर्णपणे खुले व्हावे, जहाजांवरील हल्ले थांबवावेत आणि आपले युरेनियम साठे सुपूर्द करावेत. तर इराणने वाटाघाटींची मागणी धुडकावून लावलीय. तसंच इराण आपल्या अटींवर ठाम आहे.

आखाती देशांमधील तणावाने जगाची इंधन कोंडी झाली आहे. काही देशांवर तर आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच महिन्यातील आखातातील युद्धाने संपूर्ण जग होरपळलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व देशांनी युद्धविरामाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com