

डीएमके आमदार अनिता राधाकृष्णन यांना पोलिसांकडून अटक
मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप
मद्रास हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला
अटकेनंतर तामिळनाडूतील राजकारणात खळबळ
तामिळनाडूमधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. डीएमकेचे तिरुचेंदूर मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अनिता राधाकृष्णन यांना अटक करण्यात आली. मद्रास हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अनिता राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान आणि अपमानास्पद टिप्पणी केली होती. याच कारणावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. डीएमकेच्या आमदाराला अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या जयंतीनिमित्त २० जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबाबत आक्षेरार्ह विधान केले होते. पोलिसांनी सांगितले की, डीएनके आमदाराने या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केली. ज्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी राधाकृष्णन यांना तात्काळ अटक केली.
राधाकृष्णन यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या दिसण्यावर आणि चित्रपटसृष्टीतून राजकारणात केलेल्या त्यांच्या प्रवेशावर टीका केली होती. विधानसभेतील कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान डीएमके आमदार एस. ऑस्टिन आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या वादाचा संदर्भ देत राधाकृष्णन यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'ऑस्टिन बंधूंनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून विचारले, "तुम्ही तोंड उघडून बोलणार नाही का?" ते हतबल दिसत होते. जणू काही ते विचार करत होते, "मी इथे कसा अडकलो? घरी एका अभिनेत्रीसोबत मी किती आनंदी होतो. आता मी इथे अडकलो आहे.'
डीएमके आमदार राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या सभागृहातील वागणुकीची तुलना दुकानात जाणाऱ्या ग्राहकाशी केली. ते म्हणाले होते की, 'मी एक व्यापारी आहे आणि मला माहीत आहे की, जेव्हा कोणी दुकानात येते, तेव्हा त्यांना काहीतरी खरेदी करायचे असते किंवा पैसे उधार घ्यायचे असतात. त्याचप्रमाणे विधानसभेत त्यांना किती अडकल्यासारखे वाटले असेल हे मी समजू शकतो.' राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्यांच्यावर टीका केली जात होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.