Political News : मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल, बडे नेते राजीनामा देणार

PM Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक नेते मंडळींचे राजीनामे होणार असून राजकारणाची घडी बदलल्याची पाहायला मिळणार आहे.
GEORGE KURIAN RESIGNS: MAJOR MODI CABINET RESHUFFLE LIKELY BEFORE MONSOON SESSION
GEORGE KURIAN RESIGNS: MAJOR MODI CABINET RESHUFFLE LIKELY BEFORE MONSOON SESSIONSaam Tv
Published On
Summary
  • जॉर्ज कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रात राजकीय हालचालींना वेग

  • मोदी सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता

  • शिंदे गट आणि पश्चिम बंगालला मंत्रिमंडळात अधिक जागा मिळू शकते

  • जॉर्ज कुरियन यांना राज्यपालपदाची जबाबदारी मिळण्याची चर्चा

केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातून दिलेल्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमध्ये मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, आगामी काळात आणखी काही मंत्री पद सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेतील कार्यकाळ २१ जून रोजी संपला होता. भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी न दिल्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अपेक्षित मानला जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमध्ये फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काल राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले तरी, सूत्रांच्या माहितीनुसार संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

GEORGE KURIAN RESIGNS: MAJOR MODI CABINET RESHUFFLE LIKELY BEFORE MONSOON SESSION
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचाही राज्यसभेतील कार्यकाळ संपला असून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणखी एक जागा रिकामी होण्याची शक्यता आहे.

GEORGE KURIAN RESIGNS: MAJOR MODI CABINET RESHUFFLE LIKELY BEFORE MONSOON SESSION
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रीय! २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटातील काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे एनडीएमधील शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात आणखी दोन सीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशानंतर त्या राज्याला मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते. दरम्यान, जॉर्ज कुरियन यांना लवकरच राज्यपालपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com