Political News : राजकारणात खळबळ! जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही केल्याप्रकरणी बड्या नेत्याला अटक; भाजपतून झाली होती हकालपट्टी

Maharashtra Political News : गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित डुप्लिकेट सहीप्रकरणी नगरसेवक आशिष पिपरे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
GADCHIROLI COLLECTOR SIGNATURE FORGERY CASE: ASHISH PIPARE ARRESTED, COURT ORDERS FIVE-DAY POLICE CUSTODY
GADCHIROLI COLLECTOR SIGNATURE FORGERY CASE: ASHISH PIPARE ARRESTED, COURT ORDERS FIVE-DAY POLICE CUSTODYSaam Tv
Published On
Summary
  • गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित डुप्लिकेट सहीप्रकरणी आशिष पिपरेला अटक

  • न्यायालयाने आशिष पिपरे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

  • प्रकरणाचा तपास वेगाने सुरू

  • या घटनेमुळे गडचिरोलीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या डुप्लिकेट सहीप्रकरणी तपासाला वेग आला आहे. भाजप नेत्या सोनाली पिपरे यांचे पती आणि स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरेला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तसेच चामोर्शी नगरपंचायतीच्या नगरसेवक आशिष पिपरे यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीची कथित बनावट प्रत तयार करून काही कागदपत्रांचा वापर केला होता. या संदर्भात चौकशी सुरू असताना पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आणि त्याआधारे नगरसेवक आशिष पिपरेला अटक करण्यात आली.

GADCHIROLI COLLECTOR SIGNATURE FORGERY CASE: ASHISH PIPARE ARRESTED, COURT ORDERS FIVE-DAY POLICE CUSTODY
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

पिपरेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या पोलीस कोठडीदरम्यान आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस येते का, याचा तपास पोलीस करत आहेत.

GADCHIROLI COLLECTOR SIGNATURE FORGERY CASE: ASHISH PIPARE ARRESTED, COURT ORDERS FIVE-DAY POLICE CUSTODY
Gold Rate Today : महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा १८००० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीसारख्या संवेदनशील बाबीशी संबंधित आरोप समोर आल्याने प्रशासनातही खळबळ उडाली आहे. यापूर्वी भाजपमध्ये असताना पिपरे याने काँग्रेसच्या गटातून स्वीकृत नगरसेवक पद मिळवले होते. मात्र त्याची तीन महिन्यांपूर्वी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तर त्याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. भाजपमध्ये असतानाही त्याने काँग्रेसच्या गटातून स्वीकृत नगरसेवक पद मिळवले होते. तर याच्यावर अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक केल्याचाही आरोपही करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com