Dead Hand System : जगाचा विनाश करणारा 'डेड हँड'! या देशाकडे आहे जगातील सर्वात घातक शस्त्र

Russia Nuclear System : ‘डेड हँड’ ही रशियाची शीतयुद्ध काळात विकसित केलेली स्वयंचलित अण्वस्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली मानवी हस्तक्षेपाशिवाय अणुहल्ला करू शकते आणि ती संपूर्ण जगासाठी गंभीर धोका ठरू शकते.
dead hand system
dead hand system
Published On

रशिया-युक्रेन युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला अन् युद्धाची परिसि्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती. पाकिस्तानच्या धमकीमुळे जागतिक अणुयुद्धाची भीती पुन्हा बळावली. जेव्हा जेव्हा अण्वस्त्र युद्धाची चर्चा सुरू होते त्यावेळी जगाला नष्ट करणाऱ्या विनाशकारी परमाणुची चर्चा होते. त्याच पार्श्वभूमीवर रशियाच्या ‘डेड हँड’ (पेरिमीटर) या स्वयंचलित अण्वस्त्र नियंत्रण प्रणालीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने याची निर्मिती केली होती. याचं वैशिष्ट्ये म्हणजे, याला मानवी कमांडची गरज लागत नाही. मानवी हस्तक्षेपाशिवाय अण्वस्त्र हल्ला करण्यास ‘डेड हँड’ सक्षम आहे. ‘डेड हँड’मुळे संपूर्ण जगाचा विनाश होऊ शकतो. रशियाची ही प्रणाली नेमकी काय आहे, काम कसं करते? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

dead hand system
Shopian Encounter : जय जवान! जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई, एन्काउंटरमध्ये 'लश्कर'च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

‘डेड हँड’चा इतिहास

सोव्हिएत युनियनने शीतयुद्धाच्या काळात डेड हँडची निर्मिती केली होती. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये शस्त्रस्पर्धा सुरू झाली, त्यामधून या घातक तंत्रज्ञानाने जन्म दिला. १९७० मध्ये ‘डेड हँड’ अस्तित्वात आले आणि १९८५ मध्ये कार्यान्वित झाले. अमेरिकेच्या अणु हल्ल्याला प्रत्युत्तर (Mutual Assured Destruction)देण्यासाठी सेव्हिएत युनियनने डेड हँडची निर्मिती केली. १९९३ मध्ये कर्नल व्हॅलेरी यारिनिच यांनी याबाबत प्रथम खुलासा केला होता. २०११ मध्ये रशियन जनरल सर्गेई कराकेव यांनी ती अद्याप कार्यरत असल्याचे सांगितले.

dead hand system
Maharashtra Monsoon : वार्ता आनंदाची! मान्सून आगमनाची तारीख ठरली, पुणे IMD ने वर्तवला अंदाज

डेड हँड नेमकं काम कसं करतं?

डेड हँड ही अर्ध-स्वयंचलित प्रणाली आहे. संकटकाळात उच्च अधिकाऱ्यांद्वारे सक्रिय केली जाते. ही प्रणाली भूकंप, किरणोत्सर्ग, हवेचा दाब आणि प्रकाश संवेदकांद्वारे अणुहल्ल्याचा मागोवा घेते. जर अणुहल्ला होणार असल्याचे निरीक्षणात स्पष्ट झाले तर ही प्रणाली सुरू होते. यामध्ये एक कमांड रॉकेट आहे.. रेडिओ वॉरहेड असणारे हे कमांड रॉकेट रशियाच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM), पाणबुड्या आणि बॉम्बर्सना लाँचचे आदेश पाठवते. रेडिओ जॅमिंग असतानाही अलर्ट पाठवू शकते. जर रशियन नेतृत्व आणि सैन्य नष्ट झाले, तर ही प्रणाली स्वयंचलितपणे किंवा किमान मानवी हस्तक्षेपाने अण्वस्त्र हल्ला सुरू करते.

रशियाकडे सध्या १,६०० तैनात आणि २,४०० आंतरखंडीय क्षेपणास्त्रांशी जोडलेली अण्वस्त्रे आहेत. ही जगातील सर्वात मोठी अणुशक्ती म्हटले जातेय. रशियाने आपली सर्व अण्वस्त्रे "डेड हँड" प्रणालीशी जोडलेली असण्याची शक्यता आहे. रशियन नेतृत्व संपले तरी ही स्वयंचलितपणे शत्रूवर अणुहल्ला करू शकते. यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आणि आधुनिक रडार प्रणालींचा समावेश आहे. ही प्रणाली संपूर्ण अण्वस्त्र साठा एकाच वेळी सक्रिय करू शकते. पण तांत्रिक त्रुटी किंवा चुकीच्या संकेतांमुळे अणुयुद्धाचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com