Maharashtra Monsoon : वार्ता आनंदाची! मान्सून आगमनाची तारीख ठरली, पुणे IMD ने वर्तवला अंदाज

Maharashtra monsoon arrival date : पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे की, येत्या ६ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली असून पुढील ५ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra monsoon arrival date
Maharashtra monsoon arrival dateSaam TV news
Published On

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Monsoon Likely to Hit Maharashtra by June 6 : पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. २७ मे रोजी केरळ मध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून ६ जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होताना दिसतोय तसेच येत्या ५ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.

Maharashtra monsoon arrival date
Pune Unseasonal rain : पुणे चिंब भिजले! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस; पुढील २४ तास अलर्ट राहावं लागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com