Pune Unseasonal rain : पुणे चिंब भिजले! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस; पुढील २४ तास अलर्ट राहावं लागणार

Pune Rain Alert : पुणे शहर आणि उपनगरांमध्ये आज, मंगळवारी जोरदार पावसानं हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस, पुणेकरांची तारांबळ
Pune Rain Today : पुण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून, पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. saam tv
Published On

सागर आव्हाड / अक्षय बडवे, पुणे | साम प्रतिनिधी

ढगांनी सकाळपासूनच गर्दी केली असतानाच सूर्य माथ्यावर येता येता वरूणराजानं पुण्यावर बरसात केली. पुण्यासह उपनगरे आणि मध्यवर्ती भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. घामाच्या धारांनी हैराण झालेल्या पुणेकरांना पावसानं ओलेचिंब केलं. पण दुसरीकडं जोरदार पावसामुळं वाहनचालकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानं पुढील दोन ते तीन दिवसांसाठी अंदाज वर्तवला आहे. पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामुळं पुणेकरांना पुढील २४ तास अलर्ट राहावं लागणार आहे. पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावं लागणार आहे.

पुणे शहरातील सर्वच भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही वेळानंतर अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, हडपसर, कात्रज, बाणेर, औंध, हिंगणे, पिंपरी-चिंचवड आणि वाघोली आदी भागांत मध्यम ते जोरदार पाऊस बरसला. धायरी, नऱ्हे, सिंहगड रोड परिसरातही सरी कोसळल्या. काही भागांत तर विजांसह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तर वाहतूक यंत्रणाही विस्कळीत झाली होती. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचलं. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

IMD Alert : २४ तास पुण्यासाठी महत्वाचे

हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील २४ तासांत पुणे आणि परिसरात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. सक्रीय होत असलेला मान्सून आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळं इथलं तापमान ३ ते ४ अंश सेल्सियसनं घसरलं आहे. प्रचंड उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस, पुणेकरांची तारांबळ
Maharashtra Rain Update : ऐन उन्हाळ्यात पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांचं मोठं नुकसान; 'या' जिल्ह्यांना अवकाळीने झोडपलं

Monsoon : यंदा लवकरच मान्सून

मागील आठवडाभरापासून राज्याच्या बऱ्याचशा भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाच्या एन्ट्रीनं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, ग्रामीण भागात शेती, फळबागांचं नुकसान झालं आहे. यंदा मान्सूनही लवकरच हजेरी लावणार आहे. साधारण १ जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. मात्र, यावर्षी २७ मे रोजीच केरळमध्ये धडकेल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर होण्याचे संकेत असून, पाऊसही लवकरच बरसेल, असा अंदाज आहे.

पुणे शहरासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस, पुणेकरांची तारांबळ
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर सुरूच; पुण्यासह नंदुरबार, नाशिकमध्ये जोरदार पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com